शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची दिनेश आष्टीकर यांनी घेतली भेट

11 Jan 2024 18:04:51
तभा वृत्तसेवा
हदगाव,
CM Eknath Shinde : मराठवाडा विदर्भातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची कामधेनु म्हणून ओळख असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामातील साखरपूजन व शेतकरी मेळावा बुधवार रोजी पार पडला. हा मिळावा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी आयोजित केला होता. या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांची उपस्थिती होती. या शेतकरी मेळाव्याच्या दरम्यान दिनेश आष्टीकर यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली.
 
CM Eknath Shinde
 
दिनेश आष्टीकर हे हिंगोली लोकसभा इच्छुक उमेदवार नागेश आष्टीकर यांचे बंधू आहेत. ही भेट सदिच्छा होती की राजकीय स्वरूपाची होती याबाबत अधिक माहिती कळू शकली नाही. परंतु शेतकरी मेळावा असल्याने ऊस उत्पादक शेतकरी म्हणून मेळाव्याला उपस्थित असल्याने कदाचित ही भेट झाली असावी असेही बोलले जात आहे. हिंगोली लोकसभेकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पूर्णपणे तयारी करत असताना दिनेश आष्टीकर यांची एकनाथ शिंदे CM Eknath Shinde सोबत घेतलेली भेट हदगाव तालुक्यात चर्चेचा विषय बनल्याचे दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0