अयोध्या,
Ramal Pranapratistha येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश सज्ज झाला आहे. देशातील सर्वांत मोठा सण दिवाळी सणासारखेच चैतन्य उत्तरप्रदेशात आहे. Ramal Pranapratistha हा लोकोत्सव साजरा करताना उत्तरप्रदेशातील बाजारपेठा सज्ज झाल्या असून, या दिवशी राज्यात ६५०० हून अधिक विवाह होणार आहेत.
सुमारे १० हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. Ramal Pranapratistha सोन्या-चांदीचा राम दरबार, नाणी, राम मंदिराच्या आकाराची अंगठी यासह ७८ हून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. गुजरातमधून राम दरबाराचे कपडे उत्तरप्रदेशमध्ये पोहोचत आहेत. राज्यात एकाच दिवशी ६,५०० हून अधिक विवाह होणार आहेत. Ramal Pranapratistha सध्या राम मंदिरच्या प्रारूपाला सर्वाधिक मागणी आहे. हे प्रारूप तांबे, पितळ, चांदी, हार्डबोर्ड, लाकडाने बनवले जात आहेत. १५ हजारांहून अधिक हस्तकलाकार आणि कारागीर ते तयार करीत असल्याची माहिती हस्तकला विभागाकडून देण्यात आली. उत्तरप्रदेश रेडीमेड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धीरज शाह यांनी सांगितले की, भगव्या रंगाच्या कपड्यांना मागणी जास्त आहे. टी-शर्ट, कॅप, हुडीज, शाल आणि जॅकेटसाठी बुकिंग आहे. दुसरीकडे, खादी कुर्ते आणि शर्टची मागणी पाच पटीने वाढली आहे.
सुमारे दोन कोटी दिव्यांची विक्री
Ramal Pranapratistha आतापर्यंत सुमारे दोन कोटी दिव्यांची विक्री झाली आहे. उत्तरप्रदेश माती कला मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारीपर्यंत सर्व जिल्ह्यांमधून तसेच शेजारील जिल्ह्यांमधून दिव्यांच्या ऑर्डर प्रलंबित आहेत.
दीड लाखांहून अधिक लाडूची ऑर्डर
Ramal Pranapratistha फेडरेशन ऑफ हॉटेल-रेस्टॉरंट अॅण्ड स्वीट हाऊसचे पी. के. गुप्ता यांच्या मते, १.५ लाख किलोपेक्षा जास्त लाडूंच्या आगाऊ ऑर्डर आधीच मिळाल्या आहेत. फुलांचे भावही वाढले आहेत. झेंडू आणि गुलाबाची मागणी लक्षात घेऊन संपूर्ण राज्यातून त्यांची खरेदी केली जात आहे. फुले जास्त काळ साठवून ठेवता येत नसल्याने १९ तारखेपासूनच आगाऊ बुकिंग करण्यात आले आहे.
३.५ कोटी चौरस फूट फ्लेक्स होर्डिंगची होणार विक्री
Ramal Pranapratistha फ्लेक्स मार्केटचे मोठे व्यापारी विनोदकुमार यांनी सांगितले की, लखनौ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज, मेरठ, आग्रा, गाझियाबाद, नोएडा आणि गोरखपूर येथून केवळ राम मंदिराशी संबंधित कार्यक्रम, उत्सव आणि अभिनंदनासाठी ८० लाख वर्ग फूट बुक करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशमध्ये अंदाजे ३.५ कोटी चौरस फूट फ्लेक्स होर्डिंग विकले जातील. उत्तरप्रदेश बुलियन असोसिएशननुसार, राज्यातील राम मंदिराशी संबंधित सोने आणि चांदीची विक्री किमान ४०० कोटी रुपयांची असल्याचा अंदाज आहे.