कोराडीत रोकडे ज्वेलर्सचे नवे सुवर्ण दालन

-नितीन गडकरींच्या हस्ते उद्या उद्घाटन

    दिनांक :11-Jan-2024
Total Views |
नागपूर,
Rokde Jewelers : रोकडे ज्वेलर्सच्या कोराडी येथील शोरूमचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षचंद्रशेेखर बावनकुळे व आ. टेकचंद सावरकर यांच्या उपस्थितीत 13 जानेवारीला सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती राजेश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नैवैद्यम नॉर्थ स्टारच्या बाजूला नांदा, कोराडी, छिंदवाडा रोडवर ही शाखा आहे. ‘नागपूरचा दागिना’ बिरुदावली मिळवलेले 1920 पासून कार्यरत रोकडे ज्वेलर्स परंपरा, संस्कृती, श्रद्धेची अमिट छाप आणि सर्वांच्या सोबतीने, आई जगदंबेच्या आशीर्वादाने शहरवासीयांसाठी नववषार्र्ची भेट घेेऊन आले आहे.
 
Rokde Jewelers
 
माता महालक्ष्मी जगदंबेच्या कृपेने Rokde Jewelers रोकडे ज्वेलर्सला मातेच्या गर्भगृहात छत्र, तलवार, त्रिशुळ, चरण पादुका आणि मातेचे श्रृंगार दागिने व पूजा साहित्य तयार करण्याचा बहुमान आशीर्वाद म्हणून रोकडे ज्वेलर्सला मिळाला. ग्राहकांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने समोर पाऊल ठेवत रोकडे ज्वेलर्सच्या साखळीला आणखी एक कडी जोडून पाचव्या सुवर्ण दालनाचा शुुभारंभ होत आहे. कोराडी शाखा 2 हजार चौरस फूट नियोजित पार्किंगसह सर्व अत्याधुनिक सुविधांसह, रमणीय, सुंदर वातावरणात स्थापित आहे. ग्राहकांना पारंपरिक भारतीय संस्कृती आणि आधुनिक कलात्मकतेनुसार डिझाईन केलेल्या दागिन्यांचा मोठा संग‘ह ऑफर केला जातो, जो सोन्यामध्ये बनविला जातो. चांदी, हिरा, प्लॅटिनम, रत्न, सोन्या-चांदीचे देव आणि पूजा साहित्य उपलध आहे.
 
 
या मौल्यवान खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकतेची विशेष काळजी घेेऊन, केवळ बीआयएस प्रमाणित दागिनेच ग्राहकांना सादर केले जातात. शुद्ध सोने 24केटी (995), 22केटी (916), चांदीच्या (999) वस्तू मानकांवर तपासल्या जातात. कॅराटोमीटरची सुविधा चाचणीसाठी उपलब्ध आहे. या Rokde Jewelers शोरूमला भेट देण्याचे आवाहन भैय्याजी व वंदना रोकडे, राजेश व अनामिका रोकडे, सारंग व संस्कृती रोकडे, पारस रोकडे यांनी केले आहे.
बंपर ओपनिंग ऑफर
शनिवार 13 व रविवार 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांच्या खरेदीवर घडणावळ 50 टक्के सवलत व पुढील 6 महिन्यांत दुसर्‍यांदा खरेदीवर घडणावळ 25 टक्के सवलत असेल. (अटी व नियम लागू)