रामनगरात श्री रामरक्षा सामूहिक पठण संकल्प

11 Jan 2024 14:58:40
 नागपूर,
Ram Raksha रामनगरातील  श्रीराम मंदिरात  श्री रामरक्षा स्तोत्र सामूहिक पठण संकल्पामधे १२५ स्त्री पुरुष भक्तांनी श्रध्दापूर्वक व आत्यंतिक उत्साहाने भाग घेतला. यावेळी मंदिरात पाय ठेवायला जागा नव्हती. सगळीकडे रामनामाची  चैतन्य गंगा वहात होती.
 

wagh 
 
 
या उपक्रमाच्या व्यवस्थापनात आज माननीय विश्वस्त अशोक आग्रे अशोक केदार,  वृषाली शिलेदार, कोषाध्यक्ष विनोदजोशी व रामभक्त  शैला सरमुकद्दम,शामली चवरे Ram Raksha मानसी देशपांडे, विजय बोंबर्डे, लक्ष्मण मोरे, कुमार अथर्व बोंबर्डे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमासाठी  माजी नगरसेविका डॉ परिणिता  फुके यांची आवर्जून उपस्थिती लाभली होती. त्यांनी उपक्रमात सहभागी होत रामरक्षा स्तोत्राचे पठण केले.
सौजन्य: रवि वाघमारे,संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0