हिंदुत्वाचा अग्रदूत - योद्धासंन्यासी !

Swami Vivekananda नरेंद्र दत्त ते स्वामी विवेकानंद !

    दिनांक :11-Jan-2024
Total Views |
जीवन जिज्ञासा
- प्र. श्री. डोरले
Swami Vivekananda जगातील सर्व संस्कृतीत भारतीय संस्कृती ही प्राचीनतम संस्कृती आहे. भारत देश या संस्कृतीचे भौगोलिक अधिष्ठान आहे. भारत देश आणि संस्कृती ही अनादिकाळापासून दैवीगुण संपदेने युक्त अशी आध्यात्मिक संस्कृती म्हणून परिचित आहे. त्याचमुळे तिला धर्मभूमी, पुण्यभूमी, मोक्षभूमी अशा विविध नावांनी संबोधिले जाते. Swami Vivekananda अनादिकाळापासून परमेश्वराचा साक्षात्कार झालेले ऋषी-मुनी, संत-महंत, साधक, उपासक, योगी याच भूमीत जन्माला आले आहेत. हे याच भूमीचे वैशिष्ट्य आहे. Swami Vivekananda भारत भूमीचे दुसरे वैशिष्ट्य असे आहे की, अनादिकाळापासून त्या त्या काळातील परिस्थितीत येथील सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात उत्पन्न झालेल्या विपरीत परिस्थितीचे निवारण करण्यासाठी योग्य त्या क्षमतेची, विचारांची महान व्यक्ती उत्पन्न होते. अवतरीत होते. Swami Vivekananda त्या काळातील वरील सर्व क्षेत्रातील बिघडलेला ‘तोल' सांभाळते, भविष्यकालीन वाटचालीचा मार्ग निष्कंटक करते आणि आपले नियोजित कार्य (मिशन) पूर्ण झाल्यानंतर प्रभुचरणी विलीन होते. यालाच भगवद्गीतेने ‘अवतार घेणे' असे म्हटले आहे तर या प्रकारच्या जाण्याला श्री तुकोबारायांनी ‘आपुलिया माहेरा जाईन मी आता।' असे म्हटले आहे. अवतारी पुरुषांची ही श्रेष्ठ परंपरा १९ व्या शतकापर्यंत अक्षुण्णपणे चालत आली आहे. Swami Vivekananda या परंपरेत भगवान श्रीरामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद हे आधुनिक काळातील युगावतार म्हणून अवतीर्ण झालेत. आज १२ जानेवारी, स्वामी विवेकानंदांची जयंती. त्यानिमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण आणि कार्याचे चिंतन !
 
 
Swami Vivekananda-Hindu
 
 
नरेंद्र दत्त ते स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंदांचा जन्म कलकत्त्याचे विख्यात विधिज्ञ विश्वनाथ दत्त यांच्या घराण्यात १२ जानेवारी १८६३ साली झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. Swami Vivekananda त्या धार्मिक मनोवृत्तीच्या होत्या. काशी विश्वेश्वरावर त्यांची एकांतिक निष्ठा आणि श्रद्धा होती. त्यामुळे त्याच्या कृपाप्रसादानेच आपल्याला पुत्रप्राप्ती झाली आहे, हा त्यांचा अडिग विश्वास होता. त्यांचे मूळ नाव ‘वीरेश्वर' उपाख्य ‘बिले' असे होते. व्यवहारात ‘नरेंद्र' या नावाने ते परिचित होते. लहानपणापासूनच अत्यंत मेधावी, तीव्र ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, दया, करुणा, भावनांनी परिपूर्ण असे व्यक्तिमत्त्व लाभलेला हा जीवात्मा त्याचे परमेश्वराने नियोजित केलेले कार्य करण्यासाठी मानव देह धारण करून भूतलावर अवतीर्ण झाला होता. Swami Vivekananda त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे लौकिक शिक्षण चालू होते. जन्मतःच ध्यानसिद्ध प्राप्त झालेला हा युवक प्राचीन आणि अर्वाचीन तत्त्वज्ञानाशी संबंधित ३ साहित्यांच्या अफाट वाचनामुळे आणि त्याच्या मर्मग्राही चिंतनामुळे मानवी जीवनाच्या आणि जगतकारणाच्या मूलगामी, शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला. ‘कोऽहम्' मी कोण? या संपूर्ण सृष्टीला संचालित करणारी शक्ती कोणती? सर्व लोक परंपराग्रस्ततेतून देवाला परमेश्वराला याचे श्रेय देतात. हा देव खराच अस्तित्वात आहे काय? असेल तर त्याचे गुणगान करणारे जे आहेत त्यांनी ‘तो' पाहिला आहे काय? Swami Vivekananda या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी व्याकूळ झालेल्या या युवकाने अनेक साधू, संत, उपासक, कीर्तनकार, प्रवचनकारांपासून तो देवेंद्रनाथ ठाकूरांपर्यंत सगळ्यांच्या भेटी घेतल्यात.
 
 
पण त्यांना समाधानकारक उत्तर काही मिळाले नाही. मनाची व्याकूळता काही कमी झाली नाही. त्यांची मनाची तगमग आणि फडफड पाहून त्यांच्या कुटुंबातच लहानपणापासून राहणारे डॉ. श्रीरामचंद्र दत्त यांनी त्यांना सल्ला दिला. ते म्हणाले, ‘सत्याचा लाभ करून घेणेच जर खरोखर तुझे ध्येय असेल तर मग त्यासाठी तू इकडे तिकडे भटकत न फिरता तू सरळ दक्षिणेश्वरी श्रीरामकृष्णांकडे जा.' त्यांच्या सल्ल्यानंतर योगायोगाने शिमला नामक मोहल्ल्यात राहणाऱ्या सुरेंद्रनाथ मित्र यांचे घरी भगवान श्रीरामकृष्ण परमहंसाची आणि त्यांची भेट झाली. Swami Vivekananda या पहिल्याच भेटीत श्रीरामकृष्णांनी ‘लौकिकातील नरेन्द्रदत्त म्हणजे ‘सप्तर्षी' मंडळातील एक ऋषी-नररूपी नारायण जिवांचे कल्याण करण्याच्या हेतूने देह धारण करून आलेले.' हे त्यांच्या समाधी अवस्थेतील पूर्व दृश्याने लक्षात आले. त्यांनी नरेन्द्रदत्त यांना दक्षिणेश्वरी येण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार काही दिवसांनंतर मनाला कासावीस करणारा आणि हृदयाला व्याकूळ करणारा तो एकच प्रश्न, तुम्ही परमेश्वराला पाहिले आहे काय? सोबत घेऊन ते दक्षिणेश्वरी श्रीरामकृष्णाच्या भेटीला गेले तेथे त्यांनी पाहिले. Swami Vivekananda भक्तवृंदांनी घेरलेले आनंदमग्न भगवान श्रीरामकृष्ण आपल्या मधूर वाणीने त्यांना उपदेश करीत आहेत.
 
 
 
ते त्यांच्यात सहभागी झाले आणि एका विशिष्ट क्षणी मनाच्या आर्ततेने त्यांनी भगवान श्रीराम-कृष्णांना, धडधडत्या हृदयाने तोच प्रश्न विचारला- ‘महाराज, आपल्याला काय ईश्वराचे दर्शन झाले आहे?'' श्रीरामकृष्ण देवांच्या मृदुहास्यपूर्ण, प्रशान्त मुखमंडळावर अपूर्व शांतीचा प्रभा फाकली. तिळमात्रही न थबकता त्यांनी उत्तर दिले. ‘होय बाळ! मला ईश्वराचे दर्शन झाले आहे. तुला पाहतो आहे त्यापेक्षाही कितीतरी स्पष्टपणे मी त्याला पाहिले आहे.' नरेन्द्रनाथांचा विस्मय शेकडोपट वाढवीत परत ते म्हणाले- ‘‘तू त्याला पाहू इच्छितोस? सांगेन त्याप्रमाणे वागशील तर मी तुलाही तो दाखवू शकेन.'' Swami Vivekananda (विवेकानंद चरित्र पृ. क्र. ६१) श्रीरामकृष्णांच्या होकारार्थी उत्तरामुळे नरेन्द्र दत्त या युवकाचा कायापालट झाला. श्रीरामकृष्णांच्या मार्गदर्शनाने, जीवनातील सर्व प्रकारांच्या मानसिक, भावनिक, पित्याच्या आकस्मिक निधनामुळे निर्माण झालेल्या भयानक आर्थिक अडचणींना तोंड देऊन, साधनामार्गावरून वाटचाल करणाèया या आपल्या प्रिय शिष्योत्तमाला त्याच्या अतीव आग्रहाने निर्विकल्प समाधीची अनुभूती आणि दीक्षा देऊन श्रीराम-कृष्णांनी नरेन्द्र दत्त याचे परिवर्तन ‘स्वामी विवेकानंद' या युगपुरुषात केले.
 
श्री स्वामी विवेकानंदांचे अलौकिक कार्य Swami Vivekananda
श्री योगी अरविंद म्हणतात- ‘‘श्रीरामकृष्ण यांनी जगाला देण्यासाठीचा हिंदुत्वाचा अंतिम संदेश भारतास दिला. त्यांच्या जन्मापासून एका नवीन युगाचा प्रारंभ झाला. या हिंदुत्वास सर्व जगात मार्गदर्शन करायचे आहे. भारताच्या उत्थानाचे हे कारण आहे. याचसाठी परमेश्वराने भारताच्या जीवनात पुन्हा प्राण फुंकले आहे. या चळवळीचा प्रथम उद्रेक राजकीय आणि त्याचा शेवट आध्यात्मिक रूपाने पूर्णत्वाने होईल. भारत कधीच लयास जाणार नाही. आपला वंश (हिंदू) नष्ट होणार नाही. संपूर्ण जगाचा भावी धर्म असलेल्या सनातन धर्मास प्रस्थापित करण्याचे काम भारतास करायचे आहे. हे करण्यासाठी भारतास आर्यमय करावे लागेल. (म्हणजे हिंदुत्वाचा स्वीकार करावा लागेल.) (कर्मयोगिन, १९ मार्च १९१० च्या अंकातून) योगी अरविंद हे द्रष्टे होते. सुमारे ११३ वर्षांपूर्वी केलेल्या या विधानाच्या वा भविष्यवाणीच्या पाऊलखुणा आज प्रत्यक्षरूपाने उमटताना आपण पाहतोच आहोत. अनुभवतोच आहोत. Swami Vivekananda त्यामुळे त्याच्याबाबतीत शंका घेण्याचे कारणच नाही. स्वामी विवेकानंदांनी केवळ भारताच्या संदर्भातच अलौकिक कार्य केले नाही तर त्यांनी संपूर्ण जागतिक स्तरावर हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदूंचे तत्त्वज्ञान, जीवनपद्धती, परंपरा, साहित्य या सर्व बाबतीत अत्यंत आक्रमकतेने पण विधायक दृष्टीने आपले विचार मांडलेत.
 
 
त्यासाठी त्यांनी ११ सप्टेंबर १८९३ साली अमेरिकेत शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठाचा परिपूर्ण उपयोग करून घेतला. त्याचा परिणाम संपूर्ण जगात हिंदुत्व, हिंदू धर्म, संस्कृती यासंबंधातील ‘खरे सत्य' लोकांच्या लक्षात आले. ‘हिंदू जात, हिंदू धर्म हे मरणपंथाला लागलेल्या (डाईंगगरेस) गोष्टी आहेत हा अपप्रचारातून ‘जितंमया'च्या इंग्रजांच्या अहंकारातून निर्माण झालेल्या मानसिकतेला छेद बसला. भारतात जागृती झाली. Swami Vivekananda स्वदेशी परतल्यानंतर त्यांनी कोलंबो ते अल्मोरा या दक्षिण उत्तर दिलेल्या भाषणांमधून संपूर्ण समाजात जागृतीचे वारे पसरले. ‘आता केन्द्र भारत वर्ष' ‘पुढील ५० वर्षे तुम्ही एकाच देवतेची भारतमातेची सेवा करा.' या त्यांच्या उपदेशाचा परिणाम होऊन स्वातंत्र्य आंदोलनाला केवळ भावनिकच आधार मिळाला नाही तर एका युगपुरुषाचा, दैवीगुण संपन्न असलेल्या महामानवाचा आशीर्वाद मिळाला. तो बरोबर सन १९४७ साली (१८९७+५०) फलद्रुप झाला. भारतमातेची पुढील वाटचालही या महापुरुषाने अधोरेखित करताना म्हटले आहे की, ‘ही माझी प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवासह पुनश्च आपल्या जगद्गुरुपदाच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी! Swami Vivekananda जगातली कोणतीही शक्ती तिला आता रोखू शकणार नाही.' स्वामीजींचे पुण्यस्मरण करीत आपणही ‘भारत माता की जय' म्हणत स्वागत करू या!