जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व : जिल्हाधिकारी

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन

    दिनांक :11-Jan-2024
Total Views |
गोंदिया,
Sports and cultural competition : महसूल शासनाचा महत्वाचा विभाग असून जिल्ह्यात येणार्‍या अनेक घडामोडींना सामोरे जावे लागते. कामाच्या व्यस्ततेतून आरोग्याकडे लक्ष देता यावे यादृष्टीने खेळाकडे वळावे. खेळाच्या माध्यमातून मानसिक व शारिरीक आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मानवी जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेवून विजय मिळवावा, त्यासोबतच विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्याचे नाव लौकीक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.
 
Sports and cultural competition
 
11 ते 13 जानेवारी दरम्यान आयोजित जिल्हास्तरीय Sports and cultural competition महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना आज जिल्हा क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी क्रीडाज्योत व दीप प्रज्वलित करुन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी चंद्रभान खंडाईत, उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 
 
पोलिस अधीक्षक पिंगळे म्हणाले, शरीर हे क्रीडांगण आहे. आपले शरीर सुदृढ, निरोगी व परिपक्व असले पाहिजे. सुदृढ शरिरात सुदृढ मन असले पाहिजे. खेळल्याने मनुष्याचा शारिरीक व मानसिक विकास होत असतो. प्रत्येकाने रोज सकाळी खेळल्याने व व्यायाम केल्याने शरिरातील मस्तिष्क व मन संतुलीत राहते. शरिराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. खेळल्यामुळे व व्यायाम केल्याने मुनष्य निरोगी राहतो व शरीर बळकट बनते. स्पर्धकांनी खेळ खेळतांना आपली काळजी घ्यावी. Sports and cultural competition स्पर्धकांनी खेळामध्ये वादावाद करु नये. पंचांनी दिलेला निर्णय मान्य करावे असे त्यांनी सांगितले.
 
 
प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. प्रारंभी मान्यवरांनी 5 उपविभागाचे पथसंचलनाचे निरीक्षण केले. यात तिरोडा उपविभाग संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. प्रसंगी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना खेळात वचनबध्दता, Sports and cultural competition प्रतिबध्दता व खेळाडूवृत्ती जोपासण्यासाठी क्रीडा विषयक शपथ दिली. स्पर्धेत 400 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. आभार उपजिल्हाधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी मानले.