मुले व गरोदर मातांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर

अंगणवाडी सेविकांचा ३८ दिवसापासून संप सुरू

    दिनांक :11-Jan-2024
Total Views |
कारंजा लाड, 
Anganwadi : महिला व बालकल्याण विकास प्रकल्पाअंतर्गत येणार्‍या करंजा तालुयातील २८५ अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्याने तालुयातील अंगणवाडीत शिकणारे मुले व गरोदर मातांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ४ डिसेंबर पासून अंगणवाडी सेविकांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी संप पुकारला त्यामुळे गेल्या ३८ दिवसापासून कारंजा तालुयातील अंगणवाड्या कुलूपबंद आहेत.
 
Anganwadi
 
कारंजा तालुयात १३६ अंगणवाडी Anganwadi सेविका, १३८ मदतनीस व २० मिनी अंगणवाडी सेविका असून, त्यातील १३५ अंगणवाडी सेविका ,१३० मदतनीस आणि २० मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण २८५ सेविका या संपात सहभागी झाल्या आहेत. तुटपुंज्या मानधनावर दिवसातून ८ ते ९ तास काम करून सुद्धा त्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रालंबित आहेत. त्या मागण्यांसाठी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने एका महिन्यापेक्षा अधिक काळापासून अंगणवाडी सेविकांचे कामबंद आंदोलन सुरू आहे.
 
 
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेविका Anganwadi कडून धरणे आंदोलनासह विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे .तरीही सरकारकडून निर्णय घेतला जात नसल्याने अंगणवाडी सेविका व मदतनिसांना कोणी वाली आहे का? असा प्रश्न आता त्यांना सतावत असून, गेल्या ३८ दिवसापासून संप सुरू असल्याने व मानधन नसल्याने आर्थिक समस्या देखील त्यांना सतावत आहे. त्यामुळे अंगणवाडीत शिक्षण घेणारी मुले व गरोदर माता यांना सकस पोषण आहार मिळण्यासाठी शासनाने अंगणवाडी सेविकांच्या समस्यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी त्यांच्याकडून केल्या जात आहे.