- 30 एकर जागेत एएआर इंडामेर कंपणी
नागपूर
मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात 30 एकर जागेत सर्व सुविधायुक्त अशी AAR Indamer Company एएआर इंडामेर कंपणीत पहिल्या टप्प्यात 500 कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून आगामी काळात 1200 कोटींची गुंतवणूक होईल, असा विश्वास एएआर इंडामेरचे प्रमुख तसेच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.
AAR Indamer Company : एएआर इंडामेर कंपणीत एअरबस विमानाची देखभालीचे काम सुरु करण्यात आले आहे.यासाठी जागा अपुरी पडणार असल्याने पुन्हा 20 एकर जागा घेवून कामास सुरुवात केल्या जाणार आहे. एव्हिएशनचे शिक्षण घेतलेल्या युवकांना येथे रोजगारांची संधी देण्यात आली आहे. फिलीपिन्सच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाकडून विमानाची देखभाल करण्यासंदर्भात आवश्यक परवानगी मिळाली आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या व्हिजनला लक्षात ठेवून कंपणीच्या वतीने एक एक पाउल समोर टाकल्या जात आहे. आगामी काळात एटीआर आणि बोईंग क्षमता देखील विकसित केली जाईल.त्यामुळे मध्यवर्ती मिहानमध्ये सर्वात मोठ्या एव्हिएशन मार्केटची गरज पूर्ण करण्यासाठी तयार होणार आहे. येत्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व 3 पक्ष एकत्रित निवडणूक लढणार आहोत.