नागपूर स्थित कंपन्यांनी गडचिरोलीत रोजगार शिबिरे घेण्याची आवश्यकता : आ. गजबे

विसोरा येथे टीएएसएल च्यावतीने रोजगार मेळावा

    दिनांक :12-Jan-2024
Total Views |
गडचिरोली, 
Rojgar Melava : गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांसाठी अशा प्रकारे रोजगार शिबिरे आयोजन करून नोकरी संधी दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील. तसेच उद्योजकता वाढीस लागेल. म्हणून नागपूर स्थित कंपन्यांना सतत गडचिरोली येथे शिबिरे घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार गजबे म्हणाले. टाटा अ‍ॅडव्हॅन्सड सिस्टमस लिमीटेड मिहान नागपूरच्या संयुक्त विद्यामाने वतीने विसोरा येथील राज्य राखीव पोलिस बल येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार कृष्णा गजबे बोलत होते.
 
Rojgar Melava
 
नक्षलग्रस्त भागामध्ये पोलिस व जनता यामध्ये सामाजिक बांधिलकी वाढावा व सलोखा वृंद्धींगत व्हावा यासाठी राजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गडचिरोली, गोंदीया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील तंत्रनिकेतन व औद्योगीक प्रशिक्षण संस्था येथून तांत्रीक शिक्षण पूर्ण केलेले 80 उमेदवार उपस्थित होते. Rojgar Melava यामध्ये पोलिस अंमलदार यांच्या मुलांचा देखील समावेश होता. या शिबिरांतर्गत उपस्थित सर्व उमेदवारांना टाटा अ‍ॅडव्हॅन्सड सिस्टमस लिमीटेड मिहान नागपूर येथे नोकरीवर घेण्यात येणार आहे.
 
 
या Rojgar Melava कार्यक्रमात टाटा अ‍ॅडव्हॅन्सड सिस्टमस लिमीटेडचे सहाय्यक व्यवस्थापक सोहनी यांनी प्रोजेक्टरद्वारे कंपनीबाबतची माहिती दिली. सदर कंपनी बोईंग विमान, हेलिकॉप्टर यांचे विविध भाग, संरक्षण उपकरणे व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे उत्पादन करते. नोकरीमध्ये समावून घेण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना मिहान नागपूर येथे प्रथम तीन महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला समादेशक विवेक वि. मासाळ, समादेशक सहाय्यक एल. आर. मिश्रा, सहाय्यक समादेशक दशरथ एस. जांभूळकर, एम. एम. लांबेवार, पोलिस निरीक्षक मुख्यालय एस. ए उपस्थित होते.