मुकुटबन येथे शिवभोजन थाळी सुरू करा

12 Jan 2024 19:20:14
- आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी लक्ष घालावे

झरीजामणी, 
गोरगरीब व गरजू लोकांना कमी पैशात जेवण मिळावे म्हणून Shiv Bhojan Thali शिवभोजन थाळी योजना सुरू आहे. या योजनेस चांगला प्रतिसादही मिळत असला तरी या भोजनाची खरी गरज मुकुटबनला असून हे गाव या योजनेपासून वंचित आहे. मुकुटबन येथे शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात यावी अशी परिसरातील नागरिकांत चर्चा आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ही योजना मुकुटबनमध्ये सुरू करावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे.
 
 
Shiv Bhojan Thali
 
Shiv Bhojan Thali : झरी जामणी तालुक्यातील ही सर्वात मोठी बाजारपेठ असून मुकुटबनची लोकसंख्या 15 हजारांवर आहे. मुकुटबन पोलिस ठाणे अंतर्गत 62 गावे असून 1 लाखावर लोकसंख्या आहे. इथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. ग्रामीण नागरिक, तसेच कोळसा खाणी व सिमेंट कंपनीतील मजूर कामगार मुकुटबनला व तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी व अन्य शासकीय कामांसाठी येणार्‍या गोरगरीब नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांना हॉटेलमध्ये जाऊन महागडे खाणे परवडत नाही. काही लोक तर कच्चा चिवडा खाऊन टाइमपास करतात.
 
 
त्यामुळे अशा लोकांसाठी मुकुटबनला शिवभोजन थाळी सुरू करावी, अशी मागणी अनेक संघटनांच्या वतीने केली जात आहे. याबाबत आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सकारात्मक पाऊल उचलून येथे शिवभोजन थाळी योजना सुरू करावी, अशी अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0