नागपूर,
Celebration मानेवाडा रिंगरोड येथील महाकाली नगर चौकात माँ जिजाऊ डेअरीच्या वतीने किशोर पवार यांच्या उपस्थितीत राजमाता, जिजाबाई यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे गजानन शेळके व भाजपचे वार्ड अध्यक्ष बाबाराव तायडे यांच्या हस्ते हार अर्पण करून आदरांजली देण्यात आली.डेअरीचे मालक किशोर पवार यांनी जिजामातेवरआपले विचार मांडले. ते म्हणाले ,जिजाबाई धाडसी, स्वाभिमानी, असून जनतेच्या उद्धाराकरिता समाजाला न्याय देण्याकरिता, आपले संपूर्ण आयुष्य घातले. म्हणूनच राजमाता, राष्ट्रमाता ठरल्यात. यावेळी मातोश्री जिजाऊंच्या प्रतिमेला सर्वांच्या हस्ते आंदराजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भाजपचे महामंत्री गजानन पांडुरंग शेळके, किशोर पवार, दीपक खेडकर, बाबाराव तायडे, विकास हिंगे, मामा राऊत, शाहू पवार,Celebration मोतीराम सिरसाम, दिनकर गोतमारे, मडावी साहेब तसेच चंदा पवार, राही पवार संचिता बेसरवार आणि जेष्ठ कांदे आजी यांची उपस्थिती होती.
सौजन्य - देवराव प्रधान,संपर्क मित्र