वडकी ते फुबगाव पालखी सोहळा

13 Jan 2024 19:49:41
राळेगाव, 
तालुक्यातील वडकी येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी Suresh Baba Palkhi Sohala  श्री परमहंस सुरेशबाबा यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पालखीचे हे सातवे वर्ष असून सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या श्रीसंत परमहंस सुरेशबाबा यांची ही पालखी 11 जानेवारी रोजी वडकीचे प्रभाकर सलाम यांच्या निवासस्थानी मुक्कामी होती. शुक‘वार, 12 रोजी टाळमृदंगाच्या गजरात ग्रामस्थांनी भक्तीभावाने या पालखीला निरोप दिला. ही पालखी अमरावती जिल्ह्यातील फुबगावकरिता रवाना झाली.
 
 
Palkhi dk
 
Suresh Baba Palkhi Sohala  या दिंडीचे नेतृत्व गुरुवर्य मारोतीराव गायकवाड महाराज यांच्या कृपेने पालखी संयोजक दिलीप राजूरकर, अध्यक्ष गोपाळ बोरसरे, उपाध्यक्ष प्रभाकर सलाम, सचिव अमोल बोरसरे, विठ्ठल बोरसरे, यादव भगत, भीमराव सलाम, गजानन सोयाम, वसंत बावणे, गणेश गायकवाड, गजानन गिरसावळे, गजानन पाल, सुरेश बावणे, नाना कुमरे, किशोर गारघाटे यांच्याकडे आहे. हा पालखी सोहळा 11 जानेवारी रोजी वडकी येथून वाढोणाबाजार, झाडगाव, राळेगाव, कळंब, मिटणापूर, बाभुळगाव, नांदगाव खंडेश्वर, बेलोरा, मनदेव या मार्गाने प्रस्थान करत 19 जानेवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील फुबगाव पोहोचणार आहे.
Powered By Sangraha 9.0