जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले : मैत्रेयी कुळकर्णी

    दिनांक :14-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Maitreyi Kulkarni कीर्तन महोत्सव आयोजन समिती द्वारा आयोजित समिती द्वारा आयोजित कीर्तन महोत्सवातसहावे कीर्तनपुष्प गुंफतांना त्यांनी दास गणूमहाराजांच्या ‘जो का कीर्ती रूपे उरला । बुध हो नर समजा त्याला ॥’’ या अभंगावर निरूपण केले. अध्यात्म शास्त्राचा पहिला प्रश्नच मुळी ॠमी कोण आहे? मी काय आहे ? आणि मी कशासाठी आहे ? जन्माला येणं-जगणं... आणि या इहलोकीचा निरोप घेणं, म्हणजेच जीवन आहे काय ? सत्ता, संपत्ती, श्रेष्ठ, कनिष्ठ या क्षणभंगुर कर्मात गुंतण म्हणजे जीवन जगणे होय का ? नाही कदापी नाही.
 
 
Maitreyi Kulkarni
 
संत म्हणतात, ‘लक्ष लक्ष यौवनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा’ दुर्लभ असं हे मानव जीवन सार्थकी लागावं यासाठीच तर हा मानव देह मिळाला. स्वधर्म, स्वदेव आणि स्वदेश हे तीन तत्त्व मानव जीवनाचा उद्देश असावा या मध्ये स्वदेश हे महत्त्वाचं देश सुरक्षित तर आपण सुरक्षित, धर्म सुरक्षित, 1206 पासून सुलतानशाहीचा कहर, मुघलांचे अत्याचार आणि इंग‘जांची कुटनीती या कालखंडात देशाचे, धर्माचे अतोनात नुकसान झाले. मात्र परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. Maitreyi Kulkarni आपल्या थोरवीरांनी आपलं बलीदान करून आपल्याला आजचा दिवस दाखविला. त्या सर्व वीरांना आपण वंदन करू या...! धर्म रक्षणासाठी आपला देह झिजविला त्यांना वंदन करूया ! ‘जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले.’ त्या समस्त हुतात्म्यांच्या चरणी कृतार्थ होऊ या, असे प्रतिपादन मैत्रेयी कुळकर्णी यांनी केले.
 
सत्ता संपत्ती क्षणभंगुर जीवना बरोबरच संपते, पण कीर्ती मात्र अजरामर आहे.कारण आहे त्यांनी केलेला त्याग. त्याग करतो तो राष्ट्रपुरूष ठरतो असे त्या म्हणाल्या. श्रद्धानंदांनी त्याग केला भगव्या झेंड्याखाली आर्य संस्कृतीच्या पाईकांना एकत्र केल, आणि त्याच्यां पावलावर पाऊल ठेवून डॉ. केशवराव हेडगेवार यांनी धर्म रक्षणाची, राष्ट्ररक्षणाची चळवळ उभी केली ती केवळ शालेय शिक्षण घेत असतांना आणि 51 वर्षात केवळ तीसर्या वर्गात असतांना शाळा तपासणीस इंग‘ज अधिकार्यासमोर ॠवंदे मातरम्’ चा नारा दिला दिंडी, साकी,पोवाडा या विविधांगी काव्यातून कीर्तनकारांनी डॉ.केशवराव हेडगेवार यांचे आ‘यान अत्यंत प्रभावीपणे सादर केले. कीर्तन काराचे स्वागत शैला सज्जनवार यांनीकेले. संवादिनी वादक गंगाधरराव देव यांनी ॠमाझे माहेर पंढरी’ हे भक्तीगीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.तबल्यावर सतीश वालगुंजे यांनी साथ संगत केली. आरतीचे यजमानपद शैला सज्जनवार, कल्पना, सौ. भांदककर, सौ.कळसकर, कीर्ती तारक, सौ. अंजली यांनी भूषविले. याप्रसंगी भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने कीर्तन आयोजनात सेवा समर्पित करणारे अशोककुमार सिंघानिया, मनोहर भुजाडे, दिलीप मादेशवार, आशिष भिसे यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र प्रदान करून भावपूर्ण सत्कार करण्यात आला.