नियमित सराव, मेहनतीनेच पदकप्राप्ती

-टेबल टेनिस खेळाडू समृद्धी कुलकर्णीचे मत

    दिनांक :15-Jan-2024
Total Views |
नागपूर,
Samriddhi Kulkarni : नियमित सराव तसेच मेहनतीनेच पदक जिंकता येते, असे सांगत आगामी 2028 मध्ये ऑलम्पिक खेळण्याचे स्वप्न मनी बाळगून महाविद्यालयीन शिक्षणाची तसेच सरावाची वेळ निश्चित केली असल्याचे मुंबईत झालेल्या पश्चिम क्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी तसेच टेबल टेनिस खेळातील मागील वर्षाची स्टेट चॅम्पियन समृद्धी कुलकर्णी हिने सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत समृद्धी एसएनडीटी विद्यापीठाचे टेबल टेनिसमध्ये प्रतिनिधित्व करीत आहे. एसएनडीटीच्या पुणे येथील महाविद्यालयात Samriddhi Kulkarni समृद्धी मेडिकल न्यूट्रिशनचे धडे घेत आहे. खेळाचा कौटुंबिक वारसा तिला मिळाला असून तिचे वडील, बहीण, आत्या, आते बहीण खेळाडू आहेत.
 
Samriddhi Kulkarni
 
शालेय शिक्षणापासूनच तिच्यात खेळाची आवड निर्माण झाली. तिच्या वडिलांनी टेबल टेनिस खेळण्यास प्रोत्साहित केले. शालेय स्पर्धेमध्ये 14 वर्षांखालील गटात गुजरातच्या बडोदरा येथे झालेल्या वैयक्तिक गटात कांस्य, सांघिक गटात सुवर्ण पदक प्राप्त केले. 2015 मध्ये मच्छलीपट्टणम येथे झालेल्या स्पर्धेत रौप्य, दिल्लीत कांस्य, 2019, 20, 21 मधील शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सांघिक गटात सुवर्ण पदक मिळवले.
 
 
मुलींनी स्वतः करियर निवडीत स्वावलंबी व्हावे, असे मत तिने व्यक्तकेले. खेळामध्ये करिअर करीत मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहावे व कुटुंबाचे नाव पुढे नावे, असे आवाहन तिने केले. आज सर्वच खेळांत मुली पुढे येत असून मुलींच्या खेळातही स्पर्धा असल्याचे ती Samriddhi Kulkarni म्हणाली. स्पेनची बॅडमिंटन खेळाडू कॅरोलिना मारिनला ती आदर्श मानते.