कार्यकर्त्यांनी विकास कामांचा प्रचार करावा : येसुलाल उपराडे

bjp-election-2024 भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक

    दिनांक :15-Jan-2024
Total Views |
गोंदिया, 
 
bjp-election-2024 लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. bjp-election-2024 केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या सकारात्मक विकासकामांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची तयारी करण्यासाठी प्रत्येक बूथ स्तरावरील भाजप कार्यकर्त्यांना मोहीम सुरू करावी, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. येसूलाल उपराडे यांनी केले. bjp-election-2024 स्थानिक अग्रसेन भवन सभागृहात प्रमुख जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी व भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीत ते बोलत होते. बैठकीला माजी पालकमंत्री परिणय फुके, प्रफुल्ल गोपालदासजी अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
 
bjp-election-2024
 
 
मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे माजी आमदार गोपालदास अग्रवाल बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. bjp-election-2024 त्यांचे प्रतिनिधीत्व प्रफुल्ल अग्रवाल यांनी केले. यावेळी जिपचे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, माजी आमदार हेमंत पटले यांना बैठकीला संबोधित केले. बैठकीला भाजप जिल्हा सचिव राजकुमार नोटानी, संघटनमंत्री विदर्भ प्रांत डॉ. उपेंद्र कोठेकर, तालुका भाजप अध्यक्ष धनलाल ठाकरे, माजी आमदार रमेश कुथे, शहराध्यक्ष अमित झा, खलील पठाण, डॉ. शालिनी डोंगरे, दिनेश दादरीवाल, डॉ. मेंढे, संजू कुलकर्णी, संजय टेंभरे, शंभू शरणसिंग ठाकूर, bjp-election-2024 जिल्हा भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा भावना कदम, मनोज पटनायक, अंकित जैन, नरेंद्र हलानी, जे. एम. गोस्वामी, चिंतामण चौधरी, रवी रामटेककर, अ‍ॅड. पूजा तिवारी, झंकार उके, बाबा बिसेन, जयंत शुक्ला, बबली ठाकूर, टेंभरे, रितेश साहू, प्रतीक मिश्रा, निखिल चिखलोंडे, संजीव लिल्हारे, डॉ.कमलेश्‍वर चौधरी, गिरधारी पाचे, प्रशांत कोरे, अजित मेश्राम, डॉ. योगेश बिसेन, दीपक पटले, किशोर वासनिक (मुरपार), विनोद बिसेन, सुरेश डोंगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.