तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव, पिकांची नासाडी

    दिनांक :16-Jan-2024
Total Views |
साखरखेर्डा,
Turi crop : खरीप हंगामात तुरीचा पेरा केला जातो . बहुसंख्य शेतकरी सोयाबीन पिकातच तुरीच्या ओळी टाकतो . यावर्षी तुर पिकावर एकवेळा नव्हे तर अनेक वेळा संकटे आली आणि तुरीचे उत्पादन कमालीचे घटले . आज काही शेतात फुले तर काही शेतात पातीवर आलेली तुर आहे . पण उत्पादन किती होईल यात शंका आहे.
 
Turi crop
 
साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात 2 हजार 173 हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरा केलेला आहे . सुरुवातीला पावसाची प्रदिर्घ दांडी लावल्याने तीन महिन्यांत पाहिजे तशी पिकाची वाढ झाली नाही . आक्टोंबर महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली तुर फुलांनी बहरली . सोयाबीन हातची गेली तरी Turi crop तुर पिकावर साधेल अशी अपेक्षा होती . परंतू नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस , प्रचंड धुके पडल्याने फुले , पाती गळून पडली . अळीचा प्रादुर्भाव वाढला . रासायनिक औषधांचा फवारा करता करता शेतकरी पुन्हा आर्थीक कचाट्यात सापडला . तुरीचे पीक वाचवता येईल अशी अपेक्षा होती. परंतू डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि धुके पडल्याने 80 टक्के पीक आळीने फस्त केले . आजही काही शेतात तुरीला फुले दिसत आहे तर अगोदर लागलेला बहर अळीने फस्त केलेला दिसत आहे . तुर सोंगता येत नाही आणि शेंगा तोडता येत नाही अशी परिस्थिती शेतकर्‍यांची झाली आहे.