लोकमान्य टिळक पुतळयाजवळील पूल नवीन बांधावा

16 Jan 2024 16:47:28
आ. इंद्रनिल नाईकांना निवेदन
तभा वृत्तसेवा
पुसद, 
Lokmanya Tilak statue लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील जुने पुसद ते विठाळा याला जोडणारा अतिशय जुना असा नदीवरील लहान पुल जिर्ण झाल्यामुळे लोकमान्य टिळक पुतळयाजवळील पूल नव्याने बांधावा यासाठी आमदार इंद्रनिल नाईक यांना निशांत बयास यांनी निवेदन देण्यात दिले.
 
 
Lokmanya Tilak statue
 
कालानुरुप व वाढत्या वाहतुकीचा विचार करता या पुलाची उंची वाढविणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हा पुल पुर्णत: खरडुन गेला आहे. त्यामुळे यावरुन वाहन चालवितांना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच जुन्या शहरातून विठाळा व इतर खेडेभागातून जुन्या पुसदकडे येणार्‍या वाहन चालकांना या पुलाच्या जिर्ण अवस्थेमुळे अडथळा होत असल्याचे निवेदनात नमुद केले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन माजी नगरसेवक निशांत बयास यांनी आमदार इंद्रनिल नाईक यांची 14 जानेवारी रोजी भेट घेवून हा पुल नव्याने बांधुन तसेच त्याची उंची वाढवण्यात यावी याकरीता निवेदन दिले. Lokmanya Tilak statue यावेळी जुन्या पुसदमधील शेकडो रहिवासी उपस्थित होते. या निवेदनावर अंदाजे 300-350 नागरिकांनी स्वाक्षर्‍या करुन या पुलाची पुननिर्मितीची मागणी केली आहे. या पुलाच्या नवनिर्मीतीमुळे शहरातील वाहतुकीकरीता अजुन एक पर्याय उपलब्ध होणार आहे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच आजुबाजुच्या खेडेगावातील दुधवाले, भाजीवाले तसेच सामान्य नागरिकांना शहरात येणे सोपे होणार आहे. यासंदर्भात आ. इंद्रनील नाईक यांनी याचा गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर या पुलाचे पुननिर्माणाचे काम करण्यासंबंधी उपस्थितांना आश्वासन दिले.
Powered By Sangraha 9.0