भूपिंदरसिंग हुडा यांची ईडीकडून चौकशी

17 Jan 2024 19:25:51
- मानेसर जमीन खरेदी प्रकरणात
 
चंदीगढ,
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांची 2004-07 दरम्यान मानेसरमधील भूसंपादनातील कथित अनियमिततेच्या बेकायदेशीर सावकारी चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने बुधवारी चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार हुड्डा यांची चौकशी केली. अंमलबजावणी संचालनालयाचा तपास हा 2004 ते 2007 दरम्यान हरयाणातील मानेसर येथे वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि नोकरशहांच्या कथित संगनमताने बेकायदेशीरपणे भूसंपादन केल्याचा आहे.
 
 
Bhupinder Singh Hooda
 
या भूसंपादन प्रकरणात आपली सुमारे 1,500 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप अनेक शेतकरी आणि जमीन मालकांनी केला होता. ईडीने हरयाणा पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे सप्टेंबर 2016 मध्ये कथित जमीन घोटाळ्यातील पीएमएलए खटला नोंदवला होता. सीबीआय देखील या प्रकरणाचा तपास करीत आहे.
Powered By Sangraha 9.0