जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना राष्ट्रीय पुरस्कार

17 Jan 2024 22:52:48
नागपूर, 
Collector Dr. Vipin Itankar : भारत निवडणूक आयोगांकडून निवडणुकीच्या सुधारणांसंदर्भात जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना ’बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ’ घोषित करण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर Collector Dr. Vipin Itankar यांनी ’मिशन युवा ’ अभियान राबविले होते. या अभियाना अंतर्गत त्यांनी 15 जुलै 2023 ते जानेवारी 2024 या काळामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला लक्षात घेऊन 75 हजार युवा मतदाराची नोंदणी करण्याचे अभियान जिल्ह्यामध्ये सुरु करण्यात आले होते.
 
Collector Dr. Vipin Itankar
 
यात जानेवारी 2024 अखेर 17 ते 19 वयोगटातील 88 हजार 609 नव युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली असून अद्याप ही मतदार नोंदणी सुरू आहे. या अभियानाची नोंद भारत निवडणूक आयोगाने घेतली आहे. स्वतः उद्दिष्ट ठरवून ते पूर्ण केल्याचे विशेष कौतुक आयोगाने केले आहे. देशभरातून निवडणूक सुधारणा करणार्‍या 7 आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांना गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर Collector Dr. Vipin Itankar यांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0