तभा वृत्तसेवा
घाटंजी,
Amravati Division Library Association श्री समर्थ वाचनालय घाटंजी, स्व. गुणवंतराव डंभारे सार्वजनीक वाचनालय आमडी व तालुक्यातील सर्व वाचनालयांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय संघ यवतमाळ व अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे 2023-24 चे द्विदिवशीय संयुक्त वार्षिक अधिवेशन 13 व 14 जानेवारी रोजी घाटंजी येथे पार पडले.

ग्रंथदिंडीने अधिवेशनाची सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन नयना ठाकूर यांच्या हस्ते झाले. तसेच अमरावती विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्याम वाहुरवाघ यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलताना वर्धा येथील संतसाहित्याचे गाढे अभ्यासक असलेले प्रा. डॉ. नारायण निकम यांनी चिंता व चिंतन यावर आपले विचार प्रगट केले. प्रत्येकाने निदान एक तास तरी वाचन केले पाहिजे असे विचार स्वागताध्यक्ष मधुसूदन चोपडे यांनी व्यक्त केले. Amravati Division Library Association अमरावतीचे सहायक ग्रंथालय संचालक राजेश पाटील, यांनीग्रंथालय कर्मचार्यांविषयी विचार व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांनी वाचनालयातील आपले अभिलेख अद्ययावत कसे ठेवावे याविषयी माहिती दिली. ग्रंथालय कर्मचारी वर्गाचे आर्थिक अंदाजपत्रक व हिशोब कसे ठेवावे याविषयी अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह राम देशपांडे यांनी माहिती दिली. संध्याकाळी पाच वाजता माजी केंद्रीय मंत्री व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी अधिवेशन स्थळी भेट देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
ग्रंथालय कर्मचार्यांचे ज्वलंत प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयापर्यंत आपल्या समस्या मांडत आहे. आज ग्रंथालय कर्मचारी अर्धपोटी राहत आहेत. ग्रंथालय कर्मचार्यांची किमान वेतन मिळावे ही समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे उद्गार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले. ग्रंथालय संघ राष्ट्रीय अध्यक्ष राजशेखर बालेकर यांनी ग्रंथालय हे 1985 मध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सांस्कृतिक विभागामध्ये वर्ग करण्यात आले होते. त्यांनतर पुन्हा ते उच्च व तंत्रशिक्षण विभागामध्ये वर्ग करण्यात आले अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यवतमाळ जिल्हा कार्यवाह प्रशांत पांचभाई यांनी केले. या कार्यक्रमासाठी ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.