अनिल वाघमारे यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती

    दिनांक :19-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
माहूर,
Anil Waghmare माहूर येथील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल दत्तात्रय वाघमारे यांची भटक्या विमुक्त आघाडीच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक शासकीय विश्रामगृहात प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे यांनी प्रदेश सरचिटणीस बिभीषण पाळवदे, लोकसभा विस्तारक प्रवीण श्रीमनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. भटक्या विमुक्त आघाडीचे चिटणीसपद वाघमारे यांना दिल्याने सर्वसामान्य तळागाळातील जनतेला प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यातून जनतेचे जीवनमान उंचावणे सहज शक्य होणार आहे.
 
 
Anil Waghmare
 
त्यांच्या Anil Waghmare या नियुक्तीचे आमदार भीमराव केराम, जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, तालुका अध्यक्ष श्रीकांत घोडेकर, भाजपाचे नगरसेवक सागर महामुने, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे, बन्सगोपाल अग्रहरी, जिल्हा उपाध्यक्ष छाया राठोड, तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे, महिला आघाडी शहराध्यक्ष निर्मला जोशी, माजी शहराध्यक्ष अर्चना दराडे, पद्मा गिरे, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले, नंदकुमार जोशी, राजू दराडे, नंदकुमार कोलपवार, नागोराव सुर्वे, नीळकंठ मस्के, राजू मुडाणकरसह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.