350 वर्षाची परंपरा असलेलं धाबे यांचे राम मंदिर

*अयोध्येतील राम मंदिराने आठवणी जागल्या

    दिनांक :19-Jan-2024
Total Views |
- सतीश वखरे
हिंगणघाट, 
Ram Mandir : येथील जुन्या वस्तीतील विठ्ठल मंदिराच्या जवळ असलेले श्री रामस्वामी देवस्थान (मठ) 350 वर्षांपासुन अस्तित्वात असून अतिशय प्राचीन असलेल्या या मंदिराची देखभाल श्री रामस्वामी यांचे वंशज आजही तेवढ्याच निष्टने अतिशय धार्मिक वातावरणात साधेपणाने साजरा करीत असतात. 22 रोजी अयोध्येला रामललाची प्राण प्रतिष्ठापना होत असल्याने धाबे यांच्या राम मंदिराच्या आठवणींना उजाळा मिळाला असुन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
Ram Mandir
 
पूर्वी या प्राचीन शहराच्या या जुन्या वस्तीतील भागावर गवळी समाजाची वस्ती होती. त्याच काळी या गावावर राणी प्रभावती गुप्ता यांचे राज्य होते अशी आख्यायिका आहे. या काळात ब्रम्हचारी महाराजांनी Ram Mandir राम भक्तीचा सोहळा सुरू केला. त्यांच्या देहावसनानंतर याच ठिकाणी त्यांना समाधीस्त करण्यात आले. त्यानंतर काळात येथील धार्मिक वृत्तीचे माधवनाथ महाराज नावाचे सदगृहस्थ राहत होते. संसारात राहत असताना त्यांना राम नामाची ओढ निर्माण झाली आणि संसारातून विरक्ती घेत त्यांनी आपल्या राहत्या घरीच ब्रह्मचारी महाराजांच्या समाधीस्थळी राम मंदिराची स्थापना केली. सुंदर अष्टधातूची सुंदर प्रतिभा तयार केली पूजा करण्याची परंपरा सुरू केली. रामाला मुकुट केवळ रामजन्म व विजया दशमी या दोनच दिवशी हा मुकुट दर्शनाला ठेवण्यात येतो.
 
 
अन्य दिवशी हा मुकुट हा झाकून ठेवण्यात येतो. माधवनाथ यांच्या नंतर Ram Mandir श्री राम बुआ यांनीही श्री राम यांच्या उपासनेची परंपरा कायम ठेवली. राम नामाच्या जयघोषात व्यस्त राहत ते माधुकरी मागून आपल्या कुटुंबची गुजरान करीत असतं. त्यांच्या नंतर त्याच्या वंशजानी ही राम नामाची माळ सतत कायम ठेवली. सध्या अरविंद, संजय, किशोर ही वसंत धाबे यांची पिढी हा वसा चालवीत आहे. दरवर्षी रामजन्म व कार्तिक पौर्णिमा हे दोन उत्सव साजरे करण्यात येतात. संध्या, उज्वला व अपर्णा या धाबे घराण्यातल्या तिघीही सुना मोठ्या धार्मिक भावनेने घराण्याची ही रामभक्तीची प्राचीन परंपरा चालवीत आहे.