महमदपूरच्या सरपंच ज्योती काळे पायउतार

    दिनांक :19-Jan-2024
Total Views |
बाभुळगाव, 
महमदपूर येथील ग्रामपंचायत सदस्यांनी Sarpanch Jyoti Kale सरपंच ज्योती सुनील काळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्या संबंधीची तक्रार 8 जानेवारी रोजी तहसीलदारांकडे करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवार, 16 जानेवारीला ग्रामपंचायतीत विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये पाच विरुद्ध एक मताने अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याने ज्योती काळे सरपंचपदावरून पायउतार झाल्या आहेत.
 
 
Sarpancha-ytl
 
ज्योती काळे या सरपंचांवर इतर सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्यामध्ये विद्यमान सरपंच इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. सरपंच स्वतः कोणताही निर्णय घेत नाहीत, त्यात त्यांचे पती हस्तक्षेप करून नियमित ग्रामपंचातयच्या विकासात मनमानी करून अडथळे आणतात व बाकी सदस्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, असे आक्षेप घेण्यात आले होते.
 
 
Sarpanch Jyoti Kale : सरपंचांऐवजी त्यांचे पती कारभार करीत असल्यामुळे गावातील लोकांची बरीच कामे वेळेवर होत नव्हती. सरपंच गावाचा विकास करण्यापेक्षा स्वतःच्या विकासावर भर देतात, त्या गावाच्या हिताचा कोणताही निर्णय घेत नसल्यामुळे त्या या पदासाठी पात्र नाहीत. अशा गंभीर आरोपांसह हा अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता. त्यानुसार तहसीलदारांनी या विशेष सभेचे आयोजन केले. यावेळी ज्योती काळे यांच्याविरुद्ध दीपाली मुंडले, जिजा गाडेकर, मनकर्णा देवतळे, कृष्णा ठाकरे, दिगंबर गाडेकर या सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे ज्योती सुनील काळे यांना सरपंचपद गमवावे लागले.