फुलसावंगी :
फुलसावंगी पत्रकार संघाच्या फुलसावंगी येथील ज्येष्ठ पत्रकार Vivek Pandhare विवेक मधुकरराव पांढरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 6 जानेवारी या पत्रकार दिनी दरवर्षी फुलसावंगी पत्रकार संघाची कार्यकारी पुनर्गठित केली जाते. मागीलवर्षी शैलेश वानखेडे यांच्याकडे फुलसावंगी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाचे सूत्र सोपविण्यात आले होते. निर्भिड आणि अभ्यासू पत्रकार विवेक पांढरे यांच्याकडे यावर्षी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
पत्रकार संघाच्या विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात त्यांच्या 2024 या वर्षासाठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रा. विठ्ठल कांगणे, पो. निरीक्षक सोमनाथ जाधव, पो. उपनिरीक्षक केशव पुंजमवार, प्रा. विनोद राठोड, प्रा. सुधीर भाटे, कुणाल नाईक यांच्या हस्ते मावळते अध्यक्ष शैलेश वानखेडे व भावी अध्यक्ष Vivek Pandhare विवेक पांढरे यांचे स्वागत करण्यात आले. विवेक पांढरे यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.