public holiday on January 22 शतकानुशतकांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या आयोध्या धाममध्ये उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलला विराजमान होणार आहेत. तमाम भारतीयांसाठी हा महत्वाचा, गौरवाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घोपे यांनी या संदर्भात पत्र लिहिले आहे.
आगामी २२ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. पाच शतकांचा संघर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीमांचे भव्य मंदिर उभे झाले आहे. मंदिर उभारण्यासाठी झालेल्या संघर्षात शेकडो राम भक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात श्रीराम मंदिर उभारणीचे काम पूर्णत्वास गेले आहे. या भव्यदिव्य मंदिरात प्रभू श्री रामलला विराजमान होण्याच्या क्षणाची तमाम रामभक्तांना प्रतीक्षा लागुन आहे. २२ जानेवारीला ही प्रतिक्षा संपणार आहे. या भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रत्यक्ष अयोध्येला जाता येत नसले तरी आभासी पद्धतीने या सोहळ्याचे साक्षिदार होण्यासाठी प्रत्येक भारतीय उत्सुक आहे. public holiday on January 22 त्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी २२ जानेवारीला शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापनांना सुटी देण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.