धुक्याच्या चादरीत गुदमरली शेतातील पिकं

* सलग तीन दिवसांपासून पडतेय धुके

    दिनांक :02-Jan-2024
Total Views |
- नरेंद्र सुरकार
 
सिंदीरेल्वे, 
Field crops suffocated : तीन दिवसांपासून या भागात रोज पहाटे दाट धुके पडत आहे. त्यामुळे खरिपातील कपाशी, तूर आणि रब्बी हंगामातील सर्वच पिकांचा अक्षरशः जीव गुदमरत आहे. विविध रोगांचे आक्रमण झाल्याचे दिसुन येत आहे. या वर्षी खरीप तसेच रब्बी हंगामातील पिकांवर निसर्ग कोपला आहे. सलगच्या पर्जन्याने खरिपातील सोयाबीनची अक्षरशः वाट लागली. तुरीचा बहर जोमात असतानाच ढगाळ वातावरणामुळे फुलं गळली आणि जमिनीतील ओल कमी झाल्यामुळे मनात नसताना शेतकर्‍यांना तुरीची कापणी करावी लागली.
 
Field crops suffocated
 
गत आठवड्यापासून पहाटे धुके पडत असल्याने कपाशीवर बोंड अळीचा प्रकोप वाढला आहे. दररोज पहाटे चारपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत दाट धुके पसरलेले जाणवते.थंडी असली तरी संकरित वाण लवकरच रोगाला बळी पडते. Field crops suffocated  यंदा कापसाला भाव मिळत नाही. सरकारने अद्याप सीसीआयची खरेदी केंद्र या भागात सुरू केली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची फार कुचंबणा होत आहे. हरभर्‍यावर बहुतांश शेतकर्‍यांची भिस्त होती. पण, धुक्यामुळे चण्याचे उत्पादन उचित प्रमाणात होण्याची चिन्हं नाहीत. सोबतच गव्हाच्या उभ्या पिकांवर धुक्यामुळे तांबेरा रोग येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकार शेतकर्‍यांनी सांगितले.