प्राणप्रतिष्ठा निमंत्रण मंगल अक्षत कलश व निमंत्रण पत्रिका गावागावात पोहोचले

22 जानेवारी दिवाळी म्हणून साजरा करा

    दिनांक :02-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
Akshat kalash 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्री प्रभुरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा कार्यक‘म केवळ भारतभर नव्हे तर संपूर्ण विश्वात मोठ्या उत्साह व आनंदात साजरा होणार आहे. या अभियानाची सुरवात ‘माझे गाव माझी अयोध्या’ या संकल्पनेतून प्रत्यक्ष श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून दिग्रसनगरीत दाखल झालेल्या पूजित अक्षत कलशाची अभूतपूर्व अशा भव्य शोभायात्रेने झाली.
 
 
Akshat kalash
 
अयोध्या येथे विधिवत मंत्रोपचाराणे तयार केलेल्या या अक्षदेचे येथील श्रीराम मंदिरात महिलांनी एकत्र येऊन 108 सुशोभित असे मंगल अक्षत कलश तयार करून ते तालुक्यातील बबन महाराज कोंडोलिकर, व्यसनमुक्ती सम्राट  मधुकर खोडे महाराज, महादेव महाराज माहुरे, रामेश्वर महाराज खोडे, महंत गुरुवर्य दत्तात्रय महाराज काळे, राधा बबनराव कोंडोलीकर यांच्या उपस्थितीत ‘श्रीराम जयराम जयजय राम’  या विजय मंत्राने अक्षत कलश पूजन करून वाटप करण्यात आले.दिग्रस शहरातील सर्व प्रभगासह तालुक्यातील एकूण 84 गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात हे अक्षत कलश नेऊन पूजा व आरती केली. तर अनेक गावकर्‍यांनी हे मंगल अक्षत कलश वाजतगाजत आपल्या गावात नेले. Akshat kalash 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत या अक्षत कलशातील अक्षत, निमंत्रण पत्रिका व अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे छायाचित्र दिग‘स शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावातील घराघरात वाटून 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 ते 1 वाजता दरम्यान ‘माझे मंदिर माझे श्रीराम मंदिर’ या संकल्पनेतून आपापल्या परिसरातील मंदिरात उपस्थित राहून अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वांनी एकत्र एलईडी स्क्रीनवर लाईव्ह पाहण्यासोबतच महाआरती व प्रसाद वाटपाच्या माध्यमातून श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
22 जानेवारी दिवाळी म्हणून साजरा करा
अयोध्या येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा दिवस 22 जानेवारीला घरा समोर सडा टाकून रांगोळी काढणे, घराला तोरण बांधून भगवा ध्वज लावणे, सायंकाळी दिवे लाऊन फटाक्यांची आतिषबाजी करणे त्याच बरोबर परिसरातील मंदिरावर विद्युत रोषणाई व दिव्यांचा झगमगाट करून भजन, हनुमान चालीसा, विजय मंत्राचा जप करून महाआरती व प्रसाद वाटून 22 जानेवारी हा दिवस दिवाळी म्हणून साजरा करण्याचे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या पूजित अक्षत कलश यात्रा समितीतर्फे सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.