प्रा. दिनेश सूर्यवंशी पश्चिम विदर्भ समन्वयक

    दिनांक :02-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती,
Prof. Dinesh Suryavanshi : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रा. दिनेश सूर्यवंशी यांची महाविजय - 2024 अभियानांतर्गत पश्चिम विदर्भातली पक्षाचे सुपर वॉरियर्सचे समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शानदार विजयासाठी प्रा. दिनेश सूर्यवंशी यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. हिंगोली, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती व वर्धा या 7 लोकसभा, 30 विधानसभा, 9480 बूथ, 104280 बूथसमिती प्रमुख, 3240 सुपर वॉरियर्स यांच्या माध्यमातून प्रत्येक बुथवर भारतीय जनता पार्टीच्या मतांची टक्केवारी ही 51 टक्क्यापेक्षा जास्त असावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे.
 
Prof. Dinesh Suryavanshi
 
नियुक्तीची घोषणा 30 डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व कार्य समिती बैठकीत करण्यात आली. Prof. Dinesh Suryavanshi दिलेल्या जबाबदारी बद्दल प्रा. सूर्यवंशी यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, विदर्भ प्रदेश संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांचे आभार मानले आहे.