नागपूर,
Ramabai Ranade Memorial Education : आपल्या देशाची प्राचीन रुढी, परंपरा कायम राखूनच देशाचा सर्वांगिण विकास व्हायला हवा. ऋतूप्रमाणे आपण सर्वांनी पोषक आहार घ्यावा. याशिवाय आपल्या घरातून आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हायला हवेत. याशिवाय कर्तव्य पालन करण्याचे शिक्षण आई वडीलांनी घरीच दिले पाहिजेत. आजच्या घडीला भारताच्या अमृत काळाची माहिती शालेय पाठयक्रमात समावेश करण्याची नितांत गरज असल्याचे स्पष्ट मत प्रमुख अतिथी योजक-शाश्वत विकासासाठी संशोधन आणि धोरणात्मक नियोजन केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी व्यक्त केले.
सेवासदन शिक्षण संस्थेचा 97 वा वर्धापन दिन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. Ramabai Ranade Memorial Education यावेळी मंचावर सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते, मुरारका ग्रुपचे संचालक शंकर मुरारका, सेवासदन संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत, सत्कारमूर्ती भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेचे प्रशांत बोरसे प्रामुख्याने उपस्थित होते.
वैचारिक मंथनाची गरज
डॉ. गजानन डांगे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळूल 75 वर्षे झालीत मात्र तरी सुध्दा भटक्या समाजातील मुलांना रस्त्यांवर शिक्षण द्यावे लागत आहे. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे. आजच्या घडीला 60 टक्के खाद्य तेल इतर देशातून आयात करावे लागते. एकेकाळी आपला देश सर्वद़ृष्टीने समृध्द असताना इतर देशातून अनेक वस्तू आयात करावे लागते, तेव्हा वैचारिक मंथनाची गरज आहे. सर्वत्र विकास कामे वेगाने होत असताना नैसर्गिक संपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. Ramabai Ranade Memorial Education नर्मदा परिक्रमा करीत असताना नदीच्या पात्रातील वाळूचा उपसा वाढल्याने निसर्गाचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येते.
निरंतर सेवेचे व्रत
सेवासदन शिक्षण संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. Ramabai Ranade Memorial Education चांगले सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्याचे काम संस्थेत होत आहे.सेवासदन संस्थेने निरंतर सेवेचे व्रत घेतले असल्याचे अध्यक्षीय भाषणात शंकर मुरारका यांनी सांगितले. दगड फोडणारे,अर्धनग्न अवस्थेत राहणारे,खांद्यावरच्या झोळीत लटकणारी कुपोषित बालकांसह इतरांसाठी शाळा चालविणे सोपे नाही. भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेने भटक्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे व्दार उघडले असल्याचे कांचन गडकरी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
कोणत्याही सुविधा नसताना भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेव्दारे पालावरची शाळा चालविल्या जात आहे. भटक्या मुलांना शिक्षण देणे, हे एक आवाहन असल्याचे प्रशांत बोरसे यांनी आपल्या अनुभव कथनात सांगितले. सेवासदन शिक्षण संस्थेच्या वतीने रमाबाई रानडे स्मृती शिक्षण- प्रबोधन पुरस्कार प्रशांत बोरसे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. Ramabai Ranade Memorial Education पुरस्कार स्वरूपात 51 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र प्रमुख अतिथींच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेचे सर्व शिक्षक सदस्य व विद्यार्थी मंचावर आले होते.
पुरस्कार कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. Ramabai Ranade Memorial Education प्रास्ताविक कांचन गडकरी यांनी केले. शारदा स्तवन व एकल गीत राधा ठेंगडी यांनी म्हटले. कार्यक्रमाचे संचालन अंकिता खोंडेकर यांनी तर आभार डॉ.कल्पना तिवारी यांनी मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जी.एन.(बापू )भागवत, समय बन्सोड, साधना हिंगवे, डॉ.बाबा नंदनपवार, निर्मला बोरसे, राजेंद्र दोणाडकर,श्रीकांत तिजारे,शिवाजी कांबळे, आदी उपस्थित होते.