शेंबाळपिंपरी येथे अक्षता कलशाचे जोरदार स्वागत

02 Jan 2024 21:46:19
शेंबाळपिंपरी, 
Shembalpimpri - Akshata Kalasha : श्रीराम पूजित मंगल अक्षता समिती व समस्त हिंदू बांधवांतर्फे अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाचे जोरदार स्वागत करण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून कलशरथाची शोभायात्रा काढण्यात आली. या दरम्यान हजारो रामभक्तांंनी शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी राम, सीता, लक्ष्मण, हनुमंताची वेशभूषा केलेल्या लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधले. नगर प्रदक्षिणा झाल्यावर मंगल कलशाला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बनवण्यात आलेल्या शबरी कुटीत ठेवण्यात आले.
 
 
Shembad pimpari
 
Shembalpimpri - Akshata Kalasha : 1 जानेवारीपासून सर्व हिंदू बांधवांना अक्षता देऊन अयोध्येत 22 जानेवारीला होत असलेल्या भव्य श्रीराम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले. ‘माझे गाव, माझी अयोध्या, माझे श्रीराम मंदिर’ या संकल्पनेतून 22 तारखेला गावातील मंदिर व घर परिसरात दिवाळीसारखे वातावरण तयार करून हा सोहळा साजरा करण्याची विनंती करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0