पात्र मराठ्यांना आरक्षण मिळावे

    दिनांक :20-Jan-2024
Total Views |
- पुरूषोत्तम खेडेकर यांची भूमिका

अमरावती, 
पात्र मराठ्यांना संविधानाच्या चौकटीतून आरक्षण मिळायला हवे, अशी आमची भूमिका आहे. ही मागणी अनेक वर्षापासूनची आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे. मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्नरत असले तरी त्यांचे नेतृत्व आम्ही स्विकारण्याचे काही कारण नाही, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष Purushottam Khedekar पुरूषोत्तम खेडेकर यांनी स्पष्ट केले.
 
 
khedekar
 
मराठा सेवा संघाने सुरू केलेल्या संपर्क संवाद अभियानाअंतर्गत ते शनिवारी अमरावतीला आले असता पत्रकारांशी संवाद साधत होते. पुढे ते म्हणाले, समाजात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. सामाजिक एकोपा बिघडला आहे. शिक्षण, रोजगार, उद्योगामध्ये सुलभता नसल्याने तरूण, तरूणींमध्ये हतबलता वाढली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मराठा सेवा संघाच्या लक्षात आले आहे. मध्यंतरी कमी झालेला संपर्क व समन्वय वाढवून तरूण पिढीला मराठा सेवा संघाशी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातून मराठा सेवा संघालाही उभारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
 
केंद्र सरकारने सुरू केलेली अन्न सुरक्षा योजना चांगली असली तरी अन्न सुरक्षेची गरजच पडणार नाही, असे काम सरकारने करून जतनेला स्वालंबी बनवावे. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराचे स्वागतच आहे. पण, भाजपा व रा. स्व. संघ त्यातून आपला ऐंजडा राबवित असल्याचा आरोप Purushottam Khedekar खेडेकर यांनी केला. पत्रकार परिषदेला अरूण तनपुरे, अरविंद गांवडे, अश्वीन चौधरी, मधुकर मेहकरे, मनीष पाटील, संजय ठाकरे उपस्थित होते.
 
 
लोकसभेच्या दोन जागा
संभाजी ब्रिगेडने उबाठा शिवसेनेशी गतीवर्षी आघाडी केली होती. त्याला आमचा पाठिंबा आहे. हिंगोली आणि बुलढाणा अशा दोन लोकसभेच्या जागांची मागणी उबाठा सेनेकडे करण्यात आली आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल.