उल्हास शिंदे वाकथाॅन स्पर्धेत विजयी

    दिनांक :20-Jan-2024
Total Views |
नागपूर,
Wakthan competition खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी वाकथाॅन स्पर्धा बजाज नगरातील व्ही. एन. आय. टी. ग्राऊंड वर घेण्यात आली होती.ही स्पर्धा ६० ते७० वर्ष, ७१ते ८० वर्ष व ८० वर्षाच्या पुढील पुरुष व महिलांकरिता होती. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या पाच स्पर्धकांना निवडण्यात आले. ६० ते ७० वर्ष पुरुष गटात लोकमंच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य उल्हास शिंदे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
 
६१ 
 
 सर्व विजेत्यांना ज्येष्ठ नागरिक क्रीडा महोत्सव चे सह-संयोजक रमेश भंडारी, फेस्काम पूर्व विदर्भ अध्यक्ष वसंत कळंबे, मधुकर पाठक आदी अतिथीच्या उपस्थितीत मेडल, प्रमाणपत्र व पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.Wakthan competition लोकमंच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन प्रभाकर विंचूरकर व सचिव डॉ. दीपक शेंडेकर, ज्येष्ठ नागरिक महामंडल (विदर्भ) चे सचिव .अविनाश तेलंग तथा ज्येष्ठ नागरिक मंडळ, संतोषीनगर, धनगवळी नगरचे ईश्वर वानकर, संजय गावंडे यांनी सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे अभिनंदन केले. स्पर्धेमध्ये विजय नावकरकर, नामदेव शिंगणे, नरेंद्र आंभोरे, अशोक पाचपोर, शशिकांत देशमुख, सतीश पुजारी, श्रीकृष्ण धोटे, नाना निकम, विनोद विंचुरकर, जोगेश्वर कडू, अशोक बंडाने, सुनिल पाठराबे, मेघा देशमुख, वनिता महात्मे, लता दांडेकर, वंदना खोडे, मीना कडवे इतर५२ ज्येष्ठ नागरिकांनी सचिव डॉ. दीपक शेंडेकर यांच्या नेतृत्वात यांच्या नेतृत्वात सहभागी झाले होते.
सौजन्य :दीपक शेंडेकर,संपर्क मित्र