तभा वृत्तसेवा
वर्धा,
Ram Mandir : अयोध्येत राम लल्लाची प्रतिष्ठापना सुरू होत असताना स्थानिक गोल बाजार स्थित पुरातन राम मंदिर व शोभायात्रा समितीच्या वतीने आज 22 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 6.30 वाजता शोभा यात्रा समितीचे अध्यक्ष अरुण काशीकर यांच्या हस्ते राम, सीता लक्ष्मण यांना पवमान अभिषेक करून कार्यक्रमांना सुरुवात झाली.
20 रोजी श्री हरी सत्संग समितीतर्फे हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. त्यानंतर कॅट युथ विंग आणि श्री हरी सत्संग समितीच्या संयुक्त वतीने श्रीराम मंदिरापासून व्यापारी संवाद यात्रा काढण्यात आली. 22 रोजी सकाळी 6.30 वाजता सनई वादन, 7 ते 10 पवमान अभिषेक, सकाळी 10 ते 11 माहेश्वरी समाजातर्फे पदयात्रा व हनुमान चालीसा पठण, Ram Mandir अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे 11 ते 2 या वेळेत थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. दुपारी 2 आणि 5.30 ते 5 या वेळेत सुंदरकांड पठण, सायंकाळी 6 वाजता पालखी शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान, दुपारी खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर यांनी रामाचे दर्शन घेतले. दुपारी 12 वाजता श्रीराम ढोल पथकाने सुंदर असे वादन केले.