रामहरी पंडित नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण

    दिनांक :22-Jan-2024
Total Views |
कारंजा लाड, 
Ramhari Pandit : जिल्हा परिषद प्राथ. मराठी शाळा खेर्डा कारंजा येथिल शिक्षक रामहरी पंडित हे नुकतेच डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या यु.जी.सी. नेट परिक्षेत मराठी विषयात उत्तीर्ण झाले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी असलेली ही परीक्षा अत्यंत काठिण स्तरावर घेतल्या जाते.या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
 
Ramhari Pandit
 
या आधी मार्च २०२३ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तर्फे घेण्यात आलेल्या ३८ व्या सेट परीक्षाही Ramhari Pandit त्यांनी उत्तीर्ण केली होती हे विशेष! रामहरी पंडित हे एक अभ्यासू व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असून, त्यांचा साहित्यिक पिंड आहे. आतापर्यंत त्यांचे दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहे. क्षितिजापलीकडे हा चारोळी संग्रह व गणित सागर ही दोन पुस्तके आहेत. यापैकी गणित सागर हे पुस्तक अवघ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, स्पर्धात्मक परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी ठरले आहे. याशिवाय गझल मार्गदर्शक असून, सातत्याने गझल लेखन करीत असतात. रविवारची गझल हे त्यांचे सदर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.
 
 
२ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार्‍या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे त्यांच्या माय आणि वावर कवितेची निवड झाली आहे. Ramhari Pandit  काव्यप्रेमी शिक्षक मंच या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त साहित्यिक संघटनेचे ते वाशीम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत. सोबतच चिंतनपर सुविचार लेखनाने त्यांना एक वेगळी ओळख लाभलेली आहे. दांडगे वाचन व सकस लेखनाच्या जोरावर त्यांनी साहित्य क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.