प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमके काय?

22 Jan 2024 21:34:18
अयोध्या :
Science of Consecration मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठा करण्याची प्रक्रिया सर्वांत महत्त्वाची असते. मत्स्य पुराण, वामन पुराण आणि नारद पुराणात प्राणप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले गेले आहे. Science of Consecration हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे. वास्तविक, हा एक विधी आहे, ज्याद्वारे मंदिरात देव कींवा देवतेच्या मूर्तीचा अभिषेक केला जातो. वेद मंत्रांच्या पठणात मूर्तीची स्थापना केली जाते, यानंतर मूर्तीला देवत्व प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
 
 
Science of Consecration
प्राणप्रतिष्ठा का महत्त्वाची?
Science of Consecration प्राणप्रतिष्ठा का महत्त्वाची आहे, हे जाणून घेण्यापूर्वी त्याचा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. प्राण या शब्दाचा अर्थ जीवन शक्ती आणि प्रतिष्ठा म्हणजे स्थापना. अशाप्रकारे प्राणप्रतिष्ठेचा शाब्दिक अर्थ जीवन शक्तीची स्थापना करणे असा होतो. प्राणप्रतिष्ठेनंतर देव कींवा देवीच्या मूर्तीची पूजा करणे आवश्यक आहे. असे मानले जाते की, प्राणप्रतिष्ठेनंतर देव कींवा देवतेच्या स्थापन केलेल्या मूर्तीची पूजा केली नाही तर, तिची शक्ती कमी होते.
प्राणप्रतिष्ठा करण्याची प्रक्रिया
विधीच्या सुरुवातीला मूर्तीला सन्मानाने आणले जाते. मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून पाहुण्यासारखे तिचे स्वागत केले जाते. Science of Consecration मग त्यावर सुवासिक वस्तूंचा लेप लावला जातो, मूर्तीला दुधाने आंघोळ घातली जाते, मग मूर्ती स्वच्छ केली जाते आणि अभिषेक करण्यायोग्य बनवली जाते. त्यानंतरच्या प्रक्रियेत मूर्तीला गर्भगृहात ठेवून पूजा सुरू होते. पूजेदरम्यान मूर्तीचे तोंड पूर्वेकडे असते. मूर्ती योग्य ठिकाणी स्थापित केल्यानंतर मंत्रोच्चार करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडते. पूजा केल्यानंतर प्रथम मूर्तीवर बांधलेली पट्टी काढून डोळे उघडतात, त्यानंतर डोळ्यात मध टाकले जाते. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीमध्ये एक दिव्य जिवंतपणाची अनुभूती येते.
Powered By Sangraha 9.0