वैनगंगा नदीत उलटली डोंगा; 6 महिला बुडाल्या

दोन महिलांचे प्रेत मिळाले, चार बेपत्ता

    दिनांक :23-Jan-2024
Total Views |
गडचिरोली,
Dunga overturned in Wainganga River चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीमध्ये डोंगा उलटल्याने सहा महिला बेपत्ता झाल्या आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून महिलांचा शोध घेतला जात आहे. पण अद्याप बचाव पथकाला यश आले नाही. सहा महिला नदीमध्ये पडल्याची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आले आहे. चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही घटना घडली आहे.


Dunga overturned in Wainganga River
 
मिळालेल्या माहितीनुसार, महिला शेतीच्या कामाला निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांचा डोंगा उलटला. नावाडी पोहून पाण्याबाहेर आला. यावेळी त्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अपयश आले. शोधमोहिमेनंतर एका महिलेचा मृतदेह मिळाला आहे. पाच महिलांचा शोध घेणं अद्याप सुरुच आहे. एका माहितीनुसार या घटनेत पोलीस पाटलाची पत्नीसुध्दा वाहून गेल्याची माहिती आहे. Dunga overturned in Wainganga River या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय ज्या ठिकाणी नाव बुडाला त्या नदी किनाऱ्यावर गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. पोलिसांकडून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. 4 तासानंतरही शोधकार्य सुरुच आहे.