गुन्हेगारी वृत्तीला आळा घालणे आवश्यक

24 Jan 2024 19:26:14
वेध
- नीलेश जोशी
 
Buldhana-Murder समाजात घडणाऱ्या काही घटनांनी मन सुन्न होतं. त्या घटनांवर कसे व्यक्त व्हावे, का असे घडले असेल, खरंच राग अनावर झाला की रक्ताच्या नात्याचेही विस्मरण होतं का, अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर मनात निर्माण होते. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर हे तालुक्याचे ठिकाण. Buldhana-Murder मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास येथे नारायण गायकी याने त्याच्या लहान मुलाची पत्नी अर्थात त्याची सून, जी आठ महिन्यांची गर्भवती होती, तिला आणि मोठ्या मुलाच्या समर्थ नावाच्या सात-आठ वर्षाच्या चिमुकल्याला कुऱ्हाडीचे अनेक घाव घालून अत्यंत क्रूरतेने ठार केले. Buldhana-Murder पोलिसांच्या दृष्टीने हे दुहेरी हत्याकांड असले, तरी या हत्याकांडात जन्माला येण्यापूर्वीच एका बाळाचा मृत्यू झाला. मन विषण्ण करणाऱ्या या घटनेनंतर समस्या कितीही जटिल असली, तरी दुधावरची साय म्हटल्या जाणाऱ्या नातवाची आणि म्हातारपणाचा आधार असलेल्या मुलीसमान सुनेची हत्या इतक्या क्रूरपणे का व्हावी, असा प्रश्न पडतो. Buldhana-Murder खरं म्हणजे अशा प्रकारे क्रूरतेने हत्या झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. या आधीही अशा प्रकारच्या मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडल्या आहेत.
 
 
 
Buldhana-Murder
 
 
पण मुळात हत्या करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता काय, त्याला मानसिक आजार आहे का आणि हत्या करण्याचा निर्णय घेण्यापर्यंतची मानसिकता निर्माण होते कशी, यासह अनेक प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आले आहेत. Buldhana-Murder गुन्हेगारांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करणारे तज्ज्ञ गुन्हेगाराची विचार करण्याची पद्धत, गुन्हा करीत असताना त्याची मानसिकता, गुन्हेगाराच्या भावना आदींचा विचार करतात. त्यानुसार अनेक गुन्हेगार जगण्याचे सामाजिक नियम पाळत नाही. अशा व्यक्ती दुसऱ्यांच्या भावनांचाही विचार करीत नाही. इतरांबद्दल आपुलकी, प्रेम ही भावना त्यांच्यात अत्यल्प असते. त्यांचे विश्व केवळ स्वतःभोवती व्यापलेले असते. Buldhana-Murder स्वतःला त्रास झाला की, ते दुसऱ्याला त्रास देण्याची मानसिकता ठेवतात. अशी काही निरीक्षणे या तज्ज्ञांनी नोंदविली आहेत. याशिवाय काहींच्या मते गुन्हा करण्याची मानसिकता एका दिवसात तयार होत नाही. लहानपणापासून गुन्हा करण्याची मानसिकता असते. हळूहळू ही मानसिकता वाढत जाते आणि शेवटी क्रूरतेचा कळस असलेला गुन्हा समाजासमोर येतो.
 
 
Buldhana-Murder अनेक गुन्हेगार दीर्घकाळ मानसिक आजाराने ग्रस्त असतात. त्यांच्यामध्ये ‘अ‍ॅन्टी सोशल पर्सनॅलिटी टीसऑर्डर' तर काही जणांमध्ये ‘सीडीएच३' सारख्या जनुकांमुळे गुन्हेगाराची भावना बळावते, असेही गुन्हेगारांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. गुन्ह्यांच्या घटनांना बहुतांश वेळा कौटुंबिक आणि सामाजिक पृष्ठभूमीही कारणीभूत असते. विभक्त कुटुंब, कुटुंबातील तणाव, आई-वडिलांचा घटस्फोट आदींचा मुलांच्या वागण्यावर परिणाम होतो. Buldhana-Murder लहान वयात जरी त्याचे दुष्परिणाम नजरेस पडले नाही तरी कालांतराने ते पुढे येतात. कौटुंबिक कलहामुळे लहान वयात मुलांना समजून घेण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण नसते आणि त्यातूनच दुसऱ्यांचा आदर करण्याची भावना त्याच्यात विकसित होत नाही. एवढेच नव्हे, तर स्वतःसाठीच जगण्याची भावना दृढ होते. Buldhana-Murder यातून प्रसंगी अंतर्मनात असलेली गुन्हेगारी वृत्ती वाढते. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्याचे प्रतिबिंब उमटते. अशी व्यक्ती समाजातूनही झिडकारली जाते. त्यामुळे त्याच्यातील गुन्हेगारी वृत्ती अधिक प्रबळ होते, असे ‘क्रिमिनल सायकॉलॉजी'चा अभ्यास करणाऱ्यांचे मत आहे.
 
 
मुळात गुन्हा आणि गुन्हेगारांचा तंत्रशुद्धरीत्या अभ्यास करणारे तज्ज्ञ विविध बाबींचा उलगडा करतात. पण गुन्हेगारी वृत्ती निर्माण होऊ नये यासाठी कुटुंबातील वातावरण, प्रेम, जिव्हाळा, संस्कार या बाबी अधिक महत्त्वपूर्ण असण्याबाबत सर्वच अभ्यासकांचे एकमत आहे. Buldhana-Murder भावना आणि संवेदना असणारी प्रत्येक व्यक्ती संग्रामपूर येथील घटनेनंतर हादरून गेली नसेल तर नवलच! पण या घटनेनंतर कुटुंबासह समाजस्वास्थ्याकरिता पूर्वापार करीत असलेल्या अनेक बाबींची नव्याने सुरुवात करण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे. कुटुंबात निकोप प्रेम, जिव्हाळा तर हवाच; पण संस्काराच्या रुजवणुकीसाठी कुटुंबात असलेल्या लहान-लहान रूढी-परंपरा जपण्याची आवश्यकता आहे. भौतिकतेच्या अंधानुकरणामुळे विस्मरणात गेलेली संस्कार रुजविणारी व्यवस्था पुन्हा उभारावी लागेल. Buldhana-Murder यासाठी समाजातील काही संघटनांनी यापूर्वीच पुढाकार घेतला आहे. त्याला अधिक गती मिळावी म्हणून समाजधुरिणांसह सामाजिक आस्था असणाऱ्या संघटनांना समोर येऊन सक्रियतेने काम करावे लागेल. तरच वाईट मनोवृत्तीला, दृष्ट प्रवृत्तीला आणि गुन्हेगारी मानसिकतेला आळा घालता येईल.
९४२२८६२४८४
Powered By Sangraha 9.0