जनतेने योजनांचा लाभ घ्यावा : आ. डॉ. संदीप धुर्वे

24 Jan 2024 16:42:01
- आ. धुर्वे यांच्याहस्ते बेलोरा येथे विकसित भारत संकल्प यात्रा

आर्णी, 
भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने जनतेच्या व शेतकर्‍यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक योजना सूरू करण्यात आल्या. त्या योजनेचा लाभ जनतेला मिळावा हाच उद्देश सरकारचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिरसा मुंडा जयंतीपासुन विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा संपूर्ण भारतात गावागावात जाऊन योजनेची माहिती देत असून लाभार्थ्यांना त्याचे प्रमाणपत्र देत आहे. सर्वसामान्यांनी त्यांच्या समस्या निराकरणासाठी या कल्याणकरी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार Dr. Sandeep Dhurve डॉ. संदीप धुर्वे यांनी केले. ते बेलोरा (वन) येथे विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान बोलत होते.
 
 
belora
 
केंद्र सरकारने सुरू केलेला विकसित भारत संकल्प यात्रा, केंद्र सरकारने सुरू केलेल्या ग्रामीण जनतेच्या विकासासाठी कल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रारथ गावोगावी जाऊन महत्वपूर्ण योजनेची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम केल्या जात आहे. 18 जानेवारी रोजी आर्णी तालुक्यातील बेलोरा वन येथे आ. डॉ. संदीप धुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
 
 
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे थेट प्रक्षेपण गावातील सर्व मान्यवरांनी ऐकला. जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे सर्वप्रथम पूजन करण्यात आले. नंतर जिल्हा परिषद शाळेमधील देशासाठी शहीद झालेल्या स्मारकाला मानवंदना देण्यात आली. शासनाने महास्वच्छता अभियान सुरू केल्याप्रमाणे गावातील मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. बेलोरावन गावचे प्रथम नागरिक ग्रामपंचायत सरपंच रवी मनवर यांच्या हस्ते आमदार Dr. Sandeep Dhurve डॉ. धुर्वे यांचे स्वागत करण्यात आले.
 
 
या कार्यक्रमासाठी भाजपा तालुकाध्यक्ष किसन राठोड, योगेश काठोळे, राजेश माहेश्वरी, गटविकास अधिकारी सुधाकर पंडे, क्षेत्रीय वनाधिकारी चंदू गावंडे, नायबतहसीलदार उदय तुंडलवार, ग्रामसेवक राजेंद्र महल्ले, आरोग्य विभागाचे कर्मचारी, महसूल विभाग, कृषी विभाग व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाला गावातील महिला बचत गट, ग्रामपंचायत कार्यकारणी, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षासह असंख्य नागरिक उपस्थित होते.
 
 
छगन खडसे वरुड तुका यांच्यावर अस्वलाने हल्ला करून जखमी केले होते. वनविभागाकडुन त्यांच्या औषध उपचारासाठी, दवाखान्याच्या खर्चासाठी 1 लाख 25 हजार रुपयांचा धनादेश आमदार Dr. Sandeep Dhurve धुर्वे यांच्या हस्ते देऊन आर्थिक मदत देण्यात आली. गावातील लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी गोविंद इंगोले यांनी केले. सरपंच रवींद्र मनवर यांनी आभार मानले.
Powered By Sangraha 9.0