नागपूर,
Ram Mandir : अवघा देश राममय झालाय ,विविध ठिकाणच्या राम मंदिराची ओळख यानिमित्ताने सर्वांना होते आहे. उद्या श्रीराम अयोध्येत सुप्रतिष्ठित होणार. किती आनंद होतोय अगदी मनात मावेनासा झाला आहे. आम्ही सरनाईक. मुळगाव पुण्या जवळील चांबळी. आजही तिथे सरनाईक वास्तव्याला आहेत .पुण्याला रविवार पेठेत बोहरा ओळीमध्ये छोट्याशा गल्लीत एक राम मंदिर आहे.मनात कुठेतरी अयोध्येच्या मंदिराशी साम्य जाणवते. मंदिर जवळपास तीनशे साडेतीनशे वर्ष जुने आहे. आज त्याची ओळख सरनाईकांचे राम मंदिर म्हणून होते.
समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात रामभक्तांची एक फळी निर्माण केल्याचे इतिहास सांगतो. त्यांच्या शिष्यगणांमध्ये अनेक नामांकित आणि सिद्ध लोक समाविष्ट होते, असेच एक होते जयरामस्वामी.एकदा जयरामरामस्वामी मार्गाने जात असताना त्यांना शनी मारुतीची मूर्ती आढळली. Ram Mandir ही मूर्ती त्यांनी मठात नेऊन स्थापन करण्याचा विचार केला पण तिथेच त्या मूर्तीस विराजमान करावे असा दैवी संकेत जयरामरामस्वामींना दृष्टांत झाला.त्यामुळे ज्या ठिकाणीं ही मूर्ती आढळली तिथेच त्यांनी देवाचे मंदिर उभारले गेले, अर्थात् आजच्या पुण्याच्या रविवारपेठेत.जयरामरामस्वामीं भ्रमणप्रिय होते.सारा देश त्यांनी पायी पालथा घातला.
पुढें त्यांनीं गंडकी नदीच्या शिळा आणून त्यातून साधरण अडीच फूट उंचीच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती बनवून घेतल्या.असे हे राम मंदिर तयार झाले मूर्ती फार सुंदर देखणे आणि भावपूर्ण आहेत अडीच फुटाच्या मूर्ती सणावारी सजविल्या जातात गाभारा पण सुंदर .सभा मंडप जुना आणि प्राचीन काळाची ओळख सांगणारा आहे सभामंडपात काचेच्या हंड्या झुमरांनी शोभा आणलेली आहे गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान येथे विशेष उत्सव साजरा केला जातो. Ram Mandir या मंदिराचा जीर्णोद्धार पेशवे काळात झाल्याची माहिती सापडते. आजही मंदिराची प्राचीनता प्रकर्षाने विस्मित करणारी आहे.
या मंदिराची व्यवस्था अत्रे घराण्याकडे आली परंतु २० व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांचा निर्वंश झाला त्यावेळी अन्नपूर्णा रघुनाथ अत्रे यांनी चांबळीला राहणाऱ्या आपल्या भाच्याकडे म्हणजेच विनायक नरहर सरनाईक यांच्या कडे यजमानपण सोपविले.आणि आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली. Ram Mandir पुढे त्यांचे पुत्र श्री चंद्रशेखर विनायक सरनाईक यांनी ही परंपरा स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊन ही समर्थपणे पार पाडली.देशसेवेसोबत ही धरोहर जीवापाड जपली.
आज चंद्रशेखर विनायक सरनाईकांच्या पश्चात त्यांच्या कन्या, नातू या मंदिराचा कारभार निःस्वार्थ बघत आहेत .ही रामाचीच इच्छा असावी.राजश्री प्रसाद कुलकर्णी (पूर्वाश्रमीच्या कुमारी राजश्री चंद्रशेखर सरनाईक) या मंदिराच्या विद्यमान विश्वस्त आहेत. Ram Mandir आज अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेने आमच्याही राम मंदिराची स्मृति जागी झाली. आणि या साऱ्या आठवणी मनामध्ये जागा झाल्या.
गौरी सरनाईक