- स्वामी तन्निष्ठानंद महाराज यांचे प्रतिपादन
- रामकृष्ण मठातर्फे स्वामी विवेकानंद जयंती
नागपूर,
शालेय विद्यार्थ्यांवर योग्य वेळेत चांगले संस्कार करण्यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविणारे शिक्षक असायलाच हवेत, असे स्पष्ट मत रामकृष्ण मठाचे Swami Tannisthananda Maharaj स्वामी तन्निष्ठानंद महाराज यांनी व्यकत केले. राष्ट्रीय युवक दिनानिमित्त रामकृष्ण मठातर्फे विद्या मंदिर हायस्कूल, कोराडी येथे स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर स्वामी ब्रम्हानंद महाराज, मुख्याध्यापक पी.आर.राठोड, पी.आर. पाटील, डी. एन. शेंडे, पर्यवेक्षक सोलंकी, शाळेचे शिक्षक आदी उपस्थित होते.
Swami Tannisthananda Maharaj : युवक दिनानिमित्त रामकृष्ण मठातर्फे भाषण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 2 हजार 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रामकृष्ण मठ आणि विद्या मंदिर हायस्कूलच्या वतीने भव्य मिरवणूकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीत सेवानंद विद्यालय, पदमश्री रिमा पाटील कन्या विद्यालय, तेजस्विनी विद्यालय, स्व. राजीव गांधी मराठी हायस्कूल आदींचा सहभाग होता. प्रास्ताविक डी.एम.शेंडे यांनी केले. तर संचालन ठमके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस्विनी विद्यालयाचे शिक्षक, मुख्याध्यापक लोहकरे, सेवानंद पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका मोहीनी घरत, बी. सी.वरठी, बुंदे, सेवानंद विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.