तिरुअनंतपुरम्,
Arif Mohammad Khan : राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीवर आपली नाराजी दर्शविणार्या अभूतपूर्व घडामोडीत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारच्या प्रथागत धोरणाचा शेवटचा परिच्छेद वाचून दोन मिनिटांपेक्षा कमी वेळेत आपले धोरणात्मक भाषण संपविले.
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे सकाळी 9 वाजता विधानसभेत पोहोचले आणि त्यांनी 9.02 वाजताच्या आधी आपले धोरणात्मक भाषण संपवले. अगदी 9.04 वाजता ते सभागृहाच्या बाहेर निघून गेले.
त्यांचे आगमन झाल्यानंतर सभागृहाबाहेर सभापती ए. एन. शमसीर, मु‘यमंत्री पिनराई विजयन् आणि संसदीय कामकाज मंत्री के. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. खान यांनी सभागृहातील सर्वांना अभिवादन करून परंपरागत धोरणात्मक भाषणाची सुरुवात केली आणि नंतर म्हणाले, मी आता शेवटचा परिच्छेद वाचतो.
आपला सर्वांत मोठा वारसा इमारतींमध्ये किंवा स्मारकांमध्ये नाही, तर आपण संविधानाच्या अमूल्य वारशाचा आदर करतो. भारताची आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संघराज्य आणि सामाजिक न्यायाची कालातीत मूल्ये आहेत, असे राज्यपाल खान 62 पानांच्या धोरणात्मक अभिभाषणातील 136 परिच्छेदांपैकी शेवटचे वाचन करताना म्हणाले.