भारत हजारो वर्षे ऊर्जावान राहण्यासाठी कार्यरत व्हा

-प. पू. जितेंद्रनाथ महाराजांचे आवाहन
-अयोध्येतील सोहळ्यानंतर अकोल्यात प्रथमच आगमन

    दिनांक :25-Jan-2024
Total Views |
अकोला,
Jitendranath Maharaj : अयोध्येत श्रीराम जन्मभूमिवर प्रभू श्रीरामांचे भव्य दिव्य मंदिर उभे झाले असून त्या मंदिरात 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाची मूर्ति प्रतिष्ठापित झाली आहे. आता पुढील एक हजार वर्ष भारत देश सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, व राष्ट्रीय दृष्ट्या सक्षम रहावा, ऊर्जावान रहावा याकरिता सगळ्यांनी कार्यरत रहावे असा संदेश अयोध्येच्या त्या कार्यक्रमास उपस्थित राहून येथे आलेले अंजनगाव सूर्जीच्या श्री देवनाथ मठाचे अधिपती प. पू. जितेंद्रनाथ महाराज यांनी दिला आहे.
 
Jitendranath Maharaj
 
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा उत्सव व भव्य मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न करून अंजनगाव सूर्जीच्या देवनाथ मठाचे अधिपती स्वामी जितेंद्रनाथ महाराज Jitendranath Maharaj यांचे राजराजेश्वर नगरी अकोला येथे बुधवार 24 जानेवारी रोजी आगमन झाले असता त्यांचे रामभक्तांनी भव्य असे स्वागत केले.त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
 
 
जय श्रीराम, भारत माता की जय अशा गजरांसह रेल्वे स्टेशन, दत्त मंदिर, सातव चौक येथे मिरवणूक काढण्यात आली. Jitendranath Maharaj भाविकांनी श्री गुरुजींचे पूजन केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, म्हैसपूर गोसेवा प्रकल्प प्रमुख रतनलाल खंडेलवाल, माजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, माजी आ. वसंतराव खोटरे, माजी आ.नारायणराव गव्हाणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, विजय मालोकार, हरीश अलीमचंदानी, अशोक ओळंबे, नीलेश देव, विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष रेखा खंडेलवाल, स्वाती झुनझुनवाला समवेत श्रीनाथ सखा साधकवृंद, विश्वमांगल्य सभा शाखा अकोला येथील कार्यकर्त्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप, बजरंग दल, कारसेवक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.