डेहराडून,
basmati-dehradun-rice भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम तांदूळ म्हणून गणना होणाऱ्या बासमती तांदूळाचा सुगंध कमी झाला असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. उत्तराखंड बायोडायव्हर्सिटीच्या दाव्यानुसार, वेगाने होणारे शहरीकरण हे या बदलांमागील मुख्य कारण आहे. basmati-dehradun-rice विशेषत: डेहराडूनचा बासमती विशेष प्रसिद्ध असताना, गेल्या काही वर्षांत मात्र या तांदूळाचा सुगंध लक्षणीयरित्या कमी झाला आहे. डेहराडूनी बासमतीची शेती वेगाने कमी झाली आहे. कधी काळी ४१० हेक्टर क्षेत्रावर पसरलेली ही शेती आता १५८ हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादीत झाली आहे.basmati-dehradun-rice

या निष्कर्षावर पोहचण्यापूर्वी डेहराडून जिल्ह्यातील सहासपूर, विकासनगर, रायपूर आणि दोईवाला बॉक्ससह ७९ गावांमध्ये १,२४० शेतकऱ्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. आर्थिक कारणांनी ६८० कुटूंबांनी बासमतीच्या अन्य प्रजातींची शेती करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. basmati-dehradun-rice खास डेहराडूनी बासमती तांदळाच्या बियाण्यांच्या संरक्षणासाठी निश्चित तरतूद देणारे धोरण आणि योजना आखण्याची आवश्यकता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे, आपण बासमती तांदळाची सर्वोत्तम प्रजाती गमावू, अशी भिती व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, हे बियाणे आपली शुद्धता गमावत आहेत किंवा निम्न दर्जाच्या बियाण्यांसोबत त्यांचे मिश्रण होत आहे. basmati-dehradun-rice यामुळे, शुद्ध बियाण्याचा, दर्जेदार आणि अस्सल सुगंध असलेला बासमती कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
वारंवार वापरली जाणारी रासायनिक किटकनाशके, अवकाळी पाऊस आणि वाढत्या प्रदूषणामुळे बासमती तांदळाचा दर्जा खालावला असल्याचे ९० टक्के शेतकरी मान्य करतात. तर, ५० टक्के शेतकऱ्यांच्या मते, नद्या-तलाव किंवा पाण्याच्या अन्य स्रोतांमधील प्रदूषण वाढल्याने हा परिणाम झाल्याचे दिसते. शिवाय, बाजारपेठेत मिळणाऱ्या ७४ टक्के बासमती तांदूळ हा बनावट किंवा मिश्र स्वरूपाचा असल्यामुळे डेहराडूनी बासमती धोक्यात आल्याचे शेतकरी सांगतात. basmati-dehradun-rice डेहराडूनला कधीकाळी धान चक्की म्हटले जात असे. पण, आता हा भूभाग शहरीकरणाच्या कचाट्यात आला असून, सिमेंटचे जंगल बनलेला आहे. बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, शहरीकरण हेच तांदळाच्या घटत्या शेतीक्षेत्रामागचे प्रमुख कारण आहे. निवडक शेतकरी अजूनही बासमतीचीच शेती करण्याला प्राधान्य देत असून, त्यांच्या मते रासायनिक खतांचा वापर कमी केल्यास, विशेषत: युरिया आणि डीएपीचा वापर नियंत्रणात ठेवल्यास, तांदळाचा मूळ दर्जा कायम राखता येईल आणि त्याचा सुगंधही कायम राहणार आहे.basmati-dehradun-rice
त्याचा सुगंध, चव आणि फुलून शिजण्याची गुणवत्ता जबरदस्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जगतपूर खादर गावचे रहिवासी पिढ्यानपिढ्या अस्सल गुणवत्तेच्या तांदळाची शेती करत आहेत. दर्जेदार बासमतीचे पारंपरिक बियाणे त्यांच्या तीन पिढ्यांनी संरक्षित करून ठेवले आहे. basmati-dehradun-rice वर्ष २०१५ मध्ये पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये उत्पादीत होणाऱ्या तांदळाला जीआय टॅग प्राप्त झाला आहे. आतापर्यंत भारतातील ३७० वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना जीआय टॅगिंग मिळाले असून त्यामध्ये दार्जिलिंग चहा, म्हैसूरचे रेशीम, काश्मीरची पश्मिना, पंजाबची फुलकारी, नागपुरी संत्री आणि मिझो चिलीचा समावेश आहे. हिमाचल प्रदेशने अॅप्रिकॉटच्या तेलासाठी जीआय टॅगिंग मिळवले असून, चिलगोजा अर्थात पाईन नट्ससाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे.basmati-dehradun-rice