विनोद तावडे बिहारचे, प्रकाश जावडेकर केरळचे निवडणूक प्रभारी

27 Jan 2024 23:10:29
नवी दिल्ली, 
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली. भाजपा महासचिव Vinod Tawde - Prakash Javadekar विनोद तावडे यांना बिहारचे तर, प्रकाश जावडेकर यांना केरळचे निवडणूक प्रभारी करण्यात आले. भाजपा महासचिव अरुणसिंह यांनी आज निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर केली. उत्तरप्रदेशचे निवडणूक प्रभारी म्हणून बैजयंत पांडा यांची तर, मध्यप्रदेशचे प्रभारी म्हणून डॉ. महेंद्रसिंह यांची नियुक्ती करण्यात आली. मध्यप्रदेशात सतीश उपाध्याय सहप्रभारी म्हणून काम करणार आहेत.
 
 
Vinod Tawde-Prakash Javadekar
 
पश्चिम बंगालमध्ये मंगल पांडे निवडणूक प्रभारी तर, अमित मालवीय आणि आशा लकडा सहनिवडणूक प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. दुष्यंतकुमार गौतम यांची उत्तराखंडचे तर, खा. लक्ष्मीकांत बाजपेयी यांची झारखंडचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. विजय रूपाणी यांची चंदीगडचे, आशिष सूद यांची गोव्याचे, अरविंद मेनन यांची लक्षद्वीपचे, तरुण चुघ यांची लडाखचे, निर्मलकुमार सुराणा यांची पुडुचेरीचे, डॉ. दिलीप जयस्वाल यांची सिक्कीमचे, अशोक सिंघल यांची अरुणाचल प्रदेशचे तर, वाय. सत्याकुमार यांची अंदमान निकोबारचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 
 
Vinod Tawde - Prakash Javadekar : दीव दमणची जबाबदारी पुरनेश मोदी यांच्याकडे तर, सहप्रभारी म्हणून दुष्यंत पटेल असणार आहेत. हरयाणाची जबाबदारी खा. विप्लबकुमार देव आणि खा. सुरेंद्र नागर यांच्याकडे तर हिमाचल प्रदेशची जबाबदारी आ. श्रीकांत शर्मा आणि संजय टंडन यांच्याकडे देण्यात आली. कर्नाटकचे प्रभारी म्हणून डॉ. राधामोहनदास अग‘वाल तर सहप्रभारी म्हणून सुधाकर रेड्डी काम पाहणार आहेत. ओडिशाचे निवडणूक प्रभारी म्हणून खा. विजयपालसिंह तोमर आणि सहप्रभारी म्हणून लता उसेंडी तर, तामिळनाडूचे प्रभारी म्हणून अरविंद मेनन आणि सहप्रभारी म्हणून सुधाकर रेड्डीं यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली.
Powered By Sangraha 9.0