- डॉ. दिलीप गुप्ता यांचे आवाहन
- विश्वशांती होमीओ क्लिनिक येथे ध्वजारोहण
नागपूर,
जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून डॉक्टरांनी काम करावे, असे आवाहन खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे अध्यक्ष Dr. Dilip Gupta डॉ. दिलीप गुप्ता यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त विश्वशांती होमीओ क्लिनिक जुनी शुक्रवारी मार्ग, सक्करदरा चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.
Dr. Dilip Gupta : यावेळी मंचावर डॉ. संजय तांबे, प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर, एमटी टूर अँड टॅव्हल्सचे संचालक मिलिंद देशकर, गायक विजय जथे यांच्या प्रमुख उपस्थित ध्वजारोहण करण्यात आला. याप्रसंगी डॉ. अजय काळे, डॉ.विजय भोयर, डॉ.संजय सहारे,सचिन खानोरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अजय काळे यांनी तर आभार डॉ.विजय भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.संजय सहारे, डॉ.संदीप चरडे, सचिन खानोरकर,आनंद जोगेवार, डॉ.शितल जीवतोडे, डॉ.बादल गोस्वामी, राजेश रतकंठीवार, डॉ.योगेश डोये, डॉ.हरीष खरासे, निशिकांत मोरे, संजय इटणकर, राजू गोडे, अनिल महात्मे, अशोक भुजोणे, कीर्तीलता काळे, सारीका भादे, रंजना पाटील आदींनी परिश्रम घेतले.