जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

28 Jan 2024 17:31:43
वाशीम,
National Tobacco Control Programme : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत मंगरूळनाथ तालुक्यातील पोघात येथील अक्सा उर्दू हायस्कूल येथे जिल्हा शल्य चिकित्सक कावरखे याच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू नियंत्रण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
 
 National Tobacco Control Programme
 
 
 
यावेळी मानसशास्त्रज्ञ राम सरकटे यांनी तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन त्याचे विविध प्रकार व त्यापासून कसे परावृत्त व्हावे याबाबत माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यावर, शरीरावर होणारे विविध परिणाम, तंबाखूमुक्त शाळेचे ९ निकष तंबाखू जन्य पदार्थां विरोधी कायदा( कोटपा २००३) याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा सल्लागार डॉ.आदित्य पांढारकर यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे मुख कर्करोग व त्याची प्राथमिक लक्षणे या बाबत पोस्टर द्वारे विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. हायस्कूल चे मुख्याध्यापक एहसास व शिक्षक वृंद उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0