स्वच्छता मॉनिटर अभियान दुसरा टप्प्पा सुरू

    दिनांक :28-Jan-2024
Total Views |
- शाळांना सहभागी होण्याचे आवाहन

यवतमाळ, 
जिल्ह्याने पहिल्या टप्प्यातील Swachhata Monitor Abhiyan स्वच्छता मॉनिटर अभियानात उत्तम कामगिरी करीत राज्यात पाचवे तर विभागात दुसरे स्थान यवतमाळ जिल्ह्याला मिळाले होते. परंतु ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या राज्यव्यापी अभियानांतर्गत स्वच्छता मॉनिटरचा अभियानाच्या दुसर्‍या टप्प्यात समावेश केला असून स्वच्छता मॉनिटर राबविणार्‍या शाळांना 10 गुण मिळणार आहे. शालेय शिक्षणमंत्री यांनी राजभवन मुंबई येथे 5 डिसेंबरला दुसर्‍या टप्प्याचे लोकार्पण केले आहे.
 
 
Swachhata
 
यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना त्वरीत कळवावे, त्यासाठी तालुकास्तरावर तालुका समन्वयक म्हणून साधनव्यक्ती व तंज्ञस्नेही शिक्षकाची निवड करावी व ती नावे जिल्हा कार्यालयाला कळवावी. स्वच्छता मॉनिटर अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व तालुक्यातील शाळांनी प्रभावी अंमलबजावणी करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, नोडल अधिकारी सुभाष धवसे, जिल्हा समन्वयक शुभांगी वानखेडे यांनी केले आहे.
 
 
Swachhata Monitor Abhiyan  दुसर्‍या टप्प्यात 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत दररोज विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटरींग केल्याबाबत दररोज एका विद्यार्थ्याचे अनुभवाचे व्हीडीओ चित्रीत करुन दिलेल्या वेबवर सोशल मिडीयावर शेअर करावे व दुसरा टप्पा यशस्वी करण्याचे व सर्व शाळांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजहंस मेंढे यांनी कळविले आहे.