भोंदू बाबाचा विवाहितेवर अत्याचार

29 Jan 2024 20:59:48
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Bhondu Baba : पतीचे व्यसन सुटण्यासाठी आश्रमात राहत असलेल्या विवाहित महिलेवर मार्डी येथील भोंदू बाबाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून कुर्‍हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाबा फरार झाला आहे. गुरूदासबाबा उर्फ सुनील कावलकर असे गुन्हा दाखल झालेल्या बाबाचे नाव आहे. गरम तव्यावर बसलेला व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मार्डी येथील Bhondu Baba गुरूदास बाबाच्या आश्रमात भाविकांची गर्दी वाढली होती.
 
Bhondu Baba
 
दरम्यान मध्यप्रदेशातील एक महिला बाबाच्या आश्रमात आली. आपल्या पतीला दारूचे व्यसन असल्याचे तिने बाबाला सांगितले. पतीचे व्यसन सोडण्याकरीता तुला आश्रमात राहावे लागेल व काही पुजापाठ करावे लागतील. त्यानंतर तुझा पती व्यसनमुक्त होईल, अशी बतावणी बाबाने केली होती. त्यावर विश्वास ठेवून ती महिला आश्रमात राहायला तयार झाली. दोन मुले व पतीला सोडून ती सहा महिन्यापासून बाबाच्या आश्रमात होती. दरम्यान बाबाने तिच्यावर बळजबरी केली. ते सुद्धा तीने सहन केले. त्यानंतर Bhondu Baba बाबाने तिच्या सोबतच्या संबंधाचा व्हीडीओ स्वत:च्या मोबाईमध्ये काढला. ही बाब तिला माहित पडताच तिने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. या संदर्भात 25 जानेवारीला महिलेने कुर्‍हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण बाबाला लागताच तो गावातून पसार झाला. पोलिसांचे एक पथक त्याला शोधण्यासाठी रवाना झाले आहे.
Powered By Sangraha 9.0