वर्धेत तीन दिवस जाणता राजाचे प्रयोग

29 Jan 2024 19:15:10
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Janata Raja : शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत जाणता राजा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. 6 ते 8 फेब्रुवारी रोजी जाणता राजा’ Janata Raja महानाट्याचा प्रयोग स्वावलंबी मैदानावर होणार आहे. नाट्याच्या तयारीचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज 29 रोजी आढावा घेतला.
 
Janata Raja
 
जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, तहसीलदार रमेश कोळपे यांच्यासह विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. Janata Raja नाट्याचे प्रयोग यशस्वीपणे पार पडण्यासाठी विविध 15 समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस विभागाने योग्य नियोजन करावे. प्रेक्षकांसाठी पिण्याचे पाणी, पार्किंग व्यवस्था, आयोग्य विभाग आदींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. महानाट्याचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी सर्व नोडल अधिकार्‍यांनी आपसात समन्वय ठेवून कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिले.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, त्यांचे शौर्य, साहस, पराक्रम, विजयी परंपरा नवीन पिढीला माहिती व्हावी, यासाठी राज्यभर जाणता राजाचे प्रयोग केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक महापराक्रमी योद्धा, कुशल प्रशासक आणि प्रजाहितदक्ष राजा, रयतेच्या सहकार्यातून, रयतेचे राज्य निर्माण करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे Janata Raja छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमानाचा झेंडा संपूर्ण विश्वात फडकविणार्‍या या राजाची कीर्ती आजच्या पिढीला जाणता राजा या नाट्य प्रयोगातून समजणार आहे. महानाट्य पाहण्यासाठी मोफत प्रवेश मिळणार असून शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नागरिकांनी सहकुटुंब प्रयोग बघावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0