झारखंडमध्ये ईडीची छापेमारी

03 Jan 2024 10:31:30

jharkhand
 
रांची, 
ED raids झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकांनी पहाटे अनेक ठिकाणी छापे टाकले. बेकायदेशीर खाण प्रकरणी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) नेत्यांच्या जवळच्या लोकांच्या ठिकाणांवर ईडीने छापे टाकल्याचे वृत्त आहे. ईडीचे एक पथक सोरेनचे मीडिया सल्लागार अभिषेक प्रसाद उर्फ ​​पिंटू यांच्याकडेही पोहोचले आहे. अभिषेक प्रसादच्या घरासह 12 वेगवेगळ्या ठिकाणी ईडीचे पथक छापे टाकत आहेत. याशिवाय साहेबगंज येथील उपायुक्तांच्या निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला.
 
 
Powered By Sangraha 9.0